leena paul 
मनोरंजन

२०० कोटी घोटाळा प्रकरणातील अभिनेत्री लीना पॉल आहे तरी कोण?

या प्रकरणात नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी

सकाळ डिजिटल टीम

या प्रकरणात नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिसचीही चौकशी

अभिनेत्री नोरा फतेही Nora Fatehi आणि जॅकलिन फर्नांडिस Jacqueline Fernandez यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून ED होत असलेली चौकशी पाहून हे प्रकरण नेमकं काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात या दोघींची चौकशी होत आहे. याच प्रकरणात 'मद्रास कॅफे' Madras Cafe चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री लीना मारिया पॉल Leena Maria Paul हिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात अटक केली होती.

कोण आहे लीना मारिया पॉल?

लीना पॉलने शूजित सरकारच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटात एका तमिळ बंडखोराची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात लीनासह सुकेश चंद्रशेखर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचं नाव उघड झाल्यानंतर लीनाविरोधात सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. लीना ही सुकेशची गर्लफ्रेंड आहे. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली सुकेश सध्या तिहार जेलमध्ये आहे.

लीनाने २००९ मध्ये 'रेड चिलीज' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर 'हसबंड्स इन गोवा', 'कोबरा' आणि 'बिर्याणी'सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. एका वृत्तानुसार, तिने बेंगळुरूमध्ये डेंटिस्टचे प्रशिक्षण घेतले होते, परंतु नंतर तिने सिनेसृष्टीत काम करण्यासाठी डेंटिस्टचे काम सोडले. लीनावर फोर्टीस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंगला फसवण्यात सुकेशला मदत केल्याचा आरोप आहे. याआधीही ईडीने तिची अनेकदा चौकशी केली होती.

२०० कोटी घोटाळा प्रकरण काय आहे?

रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी सुकेशने त्यांच्या पत्नींसोबत मिळून एक डील केली होती. यासाठी सुकेशने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. मलविंदरची पत्नी जापना आणि शिविंदरची पत्नी अदिती यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पतींना कारागृहातून बाहेर काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याची तक्रार त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT