who is orry orhan awatramani all you need to know about Bollywood's BFF SAKAL
मनोरंजन

Who is Orry: ना हिरो ना स्टारकीड तरीही अंबानी - दीपिका सगळ्यांसोबत दिसणारा ओर्री आहे तरी कोण?

अनेक पार्टी - इव्हेंटमध्ये ओर्री सर्व सेलिब्रिटींसोबत बिनधास्त फोटो काढताना दिसतो

Devendra Jadhav

Who is Orry: तो कधी नीता अंबानींसोबत असतो तर कधी दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर दिसतो. या सेलिब्रिटींसोबत तो त्यांच्या खांद्याला खांदा लावुन बिनधास्त फोटो काढताना दिसतो.

सध्या बॉलिवुड सेलिब्रिटींचा खास मित्र म्हणुन त्याला ओळखलं जातं. कोणताही स्टारकिड नसुनही प्रत्येक मोठ्या सेलिब्रिटींसोबत हा चेहरा हमखास पाहायला मिळतो. त्याचं नाव आहे ओर्री. कोण आहे हा बॉलिवुडकरांचा खास मित्र? जाणुन घ्या

कोण आहे ओर्री? काय काम करतो?

ओर्रीचं पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी. ओर्रीचं प्रोफाईल शोधलं तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा चित्रपट किंवा टेलिव्हिजन उद्योगाशी कोणताही संबंध असल्याचं दिसत नाही.

ओर्रीच्या प्रोफाइलनुसार, ओरहानने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये 6 वर्षांहून अधिक काळ विशेष प्रकल्प व्यवस्थापक (Special Project Manager) म्हणून काम केले आहे. सध्या तो रिलायन्समध्ये त्याच पदावर कार्यरत आहे.

याशिवाय ओर्रीला ग्राफिक डिझायनर म्‍हणून काम करण्‍याची आवड असल्‍याचं त्याने शेअर केले आहे. (Latest Entertainment News)

ओर्रीने न्यूयॉर्कच्या पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइनमधून ललित कला (Fine Arts) आणि कम्युनिकेशन डिझाइनमध्ये बॅचलर केले आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर चार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

ओर्रीने एका मुलाखतीत खुलासा केली की, त्याला ९ ते ५ जॉब करण्याची आवड नाही. तो जिमला जातो, मेडिटेशन, योगा, मसाज करतो. एकुणच विविध गोष्टी करुन कामाव्यतिरिक्त स्वतःला सक्रीय ठेवण्यात त्याला आवडते. (Latest Marathi News)

ओर्री पुढे म्हणाला की तो, चित्रपट उद्योगातील अनेक लोकांना तो ओळखतो कारण अनेक सेलिब्रिटी त्याच्यासोबत शाळा आणि कॉलेजमध्ये शिकले आहेत..

ओर्री अनेकांना ओळखत असला तरीही काही मोजकेच आहेत ज्यांना तो मित्र मानतो. त्याने मुलाखतीत सांगितले, "फिल्म इंडस्ट्री'मध्ये माझे मित्र आहेत असे मी म्हणणार नाही. जे लोकं माझे मित्र आहेत ते माझे समवयस्क आहेत. आम्ही एकाच वयाचे आहोत; आम्ही सर्वजण शाळेत आणि कॉलेजमध्ये एकाच वेळी गेलो. भूमी पेडणेकर सारखे फक्त काही लोकंच आहेत ज्यांना मी इंडस्ट्रीत मित्र मानतो."

अशाप्रकारे ओर्री हा सध्या बॉलिवुडकरांचा बेस्ट फ्रेंड आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT