Who is Sukesh Chandrasekhar Jacqueline Fernandez moves to court threatens to reveal unseen evidence  SAKAL
मनोरंजन

Sukesh Chandrasekhar: प्रेमपत्र लिहिणाऱ्या सुकेशची जॅकलीनला धमकी? म्हणाला, "मी आपले स्क्रीनशॉट..."

जेलमधून जॅकलीनसाठी प्रेमपत्र लिहीणाऱ्या सुकेशने आता तिला धमकी दिलीय

Devendra Jadhav

Sukesh Chandrasekhar - Jacqueline Fernandez Web: महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस विरुद्ध कधीही न दाखवलेले पुरावे उघड करण्याची धमकी दिली आहे.

सुकेशला माझ्याबद्दलची माहिती देणे बंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. याशिवाय २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात तिच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला FIR रद्द करण्याची विनंतीही तिने केली होती.

सुकेशने दिली धमकी

आता इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सुकेशने जॅकलिनचे नाव न घेता एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने एका व्यक्तीचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी तो त्या व्यक्तीच्या चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि रेकॉर्डिंग्स रिलीज करेल,असं म्हटलं जातंय

रिपोर्टनुसार सुकेशने दावा केला आहे की, "या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटची पोहोच वाढवण्यासाठी त्याने पैसे दिले होते."

सुकेशच्या पत्राविरोधात जॅकलिन कोर्टात पोहोचली

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेशने पत्रात लिहिले आहे की, "जगाला सत्य कळले पाहिजे. खरे सत्य." दरम्यान, सुकेशच्या पत्रांबाबत जॅकलिनने बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली. तिने मंडोली कारागृहाचे अधीक्षक आणि दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) सांगितलं की, "चंद्रशेखरला तिच्याबद्दल आणखी कोणतेही पत्र, विधाने किंवा मॅसेज देऊ नये," अशा सूचना तिने दिल्या.

जॅकलीनने दिलेल्या याचिकेत सांगितलं आहे की, "चंद्रशेखरने 15 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात त्रासदायक गोष्टी लिहिण्यात आल्या. प्रसारमाध्यमांनीही ते मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केले आहे. जॅकलिनशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर साक्षीदारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे. केलेले गुन्हे लपवण्यासाठी जॅकलीनला मानसिकरित्या त्रास देणे, हा त्याचा स्पष्ट उद्देश आहे", असं जॅकलीन म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT