avika milind 
मनोरंजन

‘बालिका वधू' फेम अविका गौरला डेट करत असलेला मिलिंद चंदवानी आहे तरी कोण?

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- 'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर. अविकाने 'बालिका वधू' या मालिकेत आनंदी या बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून अविका खूप प्रसिद्धीझोतात आली आहे.आज अविकाचे अनेक चाहते आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अविकादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 

सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असणारी अविका सध्या तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.अविकाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या प्रेमाची कबुली दिलीये. अविकाने तिच्या प्रियकरासोबत एक खास फोटो शेअर करत त्याच्यासाठी पोस्टदेखील लिहिली आहे. अविकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचा प्रियकर नेमका कोण आहे? हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अविका मिलिंद चंदवानी याला डेट करतेय. मिलिंद चंदवानी आयटी क्षेत्रात काम करत असून तो रोडीजमध्येही झळकला आहे. मिलिंद आणि अविका यांची पहिली भेट एका एनजीओच्या वर्कशॉपमध्ये झाली होती. अविकाची पोस्ट पाहिल्यानंतर मिलिंदने देखील त्याच अंदाजात तिला उत्तर दिलंय.

सध्या मिलिंद आणि अविका यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अविकाने आतापर्यंत मिलिंदसोबत अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.अविका आत्ता २२ वर्षांची आहे.'बालिका वधू'प्रमाणेच तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारलीये.  

who is milind chandwani meet balika vadhu fame avika gors partner  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT