Aishwarya Rai-Bachchan Google
मनोरंजन

अंबानी कुटुंबाच्या लग्नात ऐश्वर्या लाल रंगाची साडी का नेसते? कारणही खास

टीना आणि अनिल अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात बच्चन फॅमिली रॉयल अंदाजात दिसली.

प्रणाली मोरे

मुकेश अंबानींच्या मुलांच्या लग्नानंतर आता त्यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या घरात सनई चौघडे वाजलेयत. अनिल-टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी(Anmol AMbani)याचं लग्न मोठ्या दिमाखात पार पडलं. आता अंबानी कुटुंबातलं लग्न म्हणजे बच्चन कुटुंबाला निमंत्रण असणारंच नाही का. तर अनमोल अंबानीच्या लग्नातही संपूर्ण बच्चन कुंटुंब झाडून हजर होतं. अमिताभ(Amitabh Bachchan),जया,अभिषेक,ऐश्वर्या आणि आराध्या सगळ्यांनी खास पेहराव या दिवसासाठी केला होता. यांच्यासोबत श्वेता नंदा आणि नव्या नंदाही डिझायनर पेहरावात दिसल्या. याच लग्नात ऐश्वर्यानं(Aishwarya Rai-Bachchan) नेहमीप्रमाणे अंबानी कुटुंबाच्या लग्नासाठी लाल रंगाच्या पेहरावाची निवड केली होती. तर तिच्यासोबत अभिषेक अन् आराध्या हे दोघेही लाल रंगाचा ड्रेस घालूनच दिसले. अभिषेकनं लाल रंगाची शेरवानी तर आराध्यानं(Aaradhya Rai-Bachchan) लाल रंगाची घागरा-चोली परिधान केली होती.

Aaradhya Bachchan, Abhishek Bachchan, Aishwarya Rai-Bachchan,Shaina(Fashion Designer)

या लग्नातले काही फोटो फॅशन डिझायनर शायना चुडासामानं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये ऐश्वर्या,अभिषेक आणि आराध्या लाल रंगाच्या पेहरावात सुरेख दिसत आहेत. तिघांनीही कोरोना नियम मात्र पाळलेला दिसत आहे. कारण फोटोत तिघांच्याही चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे. खरंतर शायनानेही लाल रंगाचीच साडी नेसली आहे. शायनानं लग्नाचे फोटो शेअर करताना अंबानी कुटुंबातल्या नव-दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे अमिताभ,जया,श्वेता नंदा,नव्या नंदा यांची लग्नातील उपस्थितीही त्यांच्या पेहरावामुळे लक्ष वेधून गेली. जया बच्चन यांनी हेमामालिनी यांच्यासोबत लग्नात खास फोटोशूट केलेलं दिसून आलं. तसंच हेमामालिनी यांनी एक फोटो पोस्ट केलाय ज्याचं कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. तो फोटो आहे-जया बच्चन,सुप्रिया सुळे यांच्यासोबत हेमामालिनी असा. त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की,''गूडफ्रेंड्स आऊटसाइड पार्लमेंट. धम्माल,मस्ती,कॅमेऱ्याची पर्वा नं करता लुटलेला आनंद''.

आता मुळ मुद्द्यावर येऊया. ऐश्वर्या अंबानी कुटुंबाच्या लग्नात नेहमी लाल रंगाच्या पेहरावात का दिसते किंवा लाल रंगाच्या साडीत दिसते तर याचं कारण तिनं एका मुलाखतीत मागे स्पष्ट केलं होतं. आपलं सौंदर्य,रुबाब,तेज,आनंद,उत्साह असं सारंच एकावेळेस प्रगट करणारा लाल रंग असतो म्हणूनच मी त्याची कायम निवड करते असं ती म्हणाली होती. अनमोल अंबानीच्या लग्नात तर तिनं आराध्या आणि अभिषेकसाठीही लाल रंगाच्या पेहरावाची निवड केली होती आणि सगळयांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT