Why did cricket fans tell Amitabh Bachchan that you shouldn't watch the cwc World Cup final 2023?  SAKAL
मनोरंजन

CWC 2023 Final: तुम्ही वर्ल्डकप फायनल बघू नका, अमिताभ बच्चन यांना क्रिकेट फॅन्स असं का म्हणाले?

अमिताभ यांना नेटकऱ्यांनी क्रिकेट वर्ल्डकप फायनल न बघण्याचा सल्ला दिलाय

Devendra Jadhav

Amitabh Bachchan CWC 2023 Final: काल भारताने क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये न्युझीलंडचा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये मजल मारली. आता भारत फायनलमध्ये कोणाचा सामना करणार हे आज स्पष्ट होईल.

आज होणाऱ्या साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात जो जिंकेल तो भारतासोबत फायनलमध्ये खेळेल. फायनलचा माहोल सुरु असतानाच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना चाहत्यांनी क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना न बघण्याचा सल्ला दिलाय. काय आहे कारण? जाणुन घ्या.

अमिताभ यांना सोशल मीडियावर मिळाली चेतावनी

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर सध्या चेतावनी मिळत आहे. एकदा स्वतः अमिताभ यांनी खुलासा केला की, जेव्हा ते सामना पाहत नाही तेव्हा भारतीय क्रिकेट संघ नेहमीच जिंकतो.

बुधवारी ICC सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर काही मिनिटांनी अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावर लिहिले, 'मी जेव्हा सामना पाहत नाही तेव्हा आपण जिंकतो!'

अमिताभ यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच, नेटिझन्सनी त्यांना रविवारी आगामी ICC विश्वचषक अंतिम सामना न पाहण्याचा इशारा दिला. एका यूजरने लिहिले की, 'सर फायनल मॅच पाहू नका.' दुसऱ्याने लिहिले, 'बच्चन सर, घरातच राहा.' दुसर्‍या युजरने हिंदीत कमेंट केली की, 'वर्ल्ड कप फायनलच्या अमिताभ यांना एका दुर्गम बेटावर लॉक करण्याची काहीतरी व्यवस्था करूया.' अशाप्रकारे युजर्सनी गंमतीशीर कमेंट करत अमिताभ यांना वर्ल्डकप फायनल न पाहण्याचा सल्ला दिलाय.

अमिताभ यांनी क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहिला किंवा नाही पाहिला तरीही फायनलमध्ये भारत बाजी मारुन CWC 2023 वर स्वतःचं नाव कोरणार का? हा उत्सुकतेचा विषय आहे.

अमिताभ शेवटी आपल्याला टायगर श्रॉफसोबत गणपत सिनेमात दिसले. सध्या बिग बी रजनीकांत सोबत आगामी थलैवर 350 सिनेमाचं शुटींग करत आहेत.

याशिवाय अमिताभ प्रभाससोबत आगामी कल्की सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: मोहम्मद सिराजची सुपरमॅनसारखी फिल्डिंग! बाऊंड्रीजवळ एकाच हाताने चेंडू पकडून आडवला सिक्स, पाहा Video

Chhagan Bhujbal : येवल्यातील कांदाप्रक्रिया उद्योगाला चालना; चिंचोडी एमआयडीसी मध्ये ५० एकरवर उभारणार प्रकल्प- मंत्री छगन भुजबळ

Latest Marathi News Live Update : मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

Latur News : गाव अन् आडनाव एकच, कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; तरुण-तरुणीनं थेट मृत्यूला कवटाळलं

Thane News: परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतीत! भातकापणीवर परिणाम होण्याची भीती; उत्पन्नावरही फटका बसणार

SCROLL FOR NEXT