mrunmayee-kolwalkar 
मनोरंजन

का मिळाला ब्रेक मृण्मयी कोलवालकरला?

मृण्मयी कोलवालकर

प्रीमिअर - मृण्मयी कोलवालकर 
मी मूळची पुण्याची. माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झाले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. मी लहानपणापासून कलाक्षेत्रात येणार, असे काही ठरविलेले नव्हते. माझे आजोबा बापू वाटवे हे लेखक व चित्रपट समीक्षक होते. त्यामुळे आधीपासूनच आमच्या घराची नाळ चित्रपटसृष्टीशी जोडली गेली होती. अनेक कलाकार आमच्या घरी येत असल्याने कला क्षेत्रात पदार्पण करण्यास माझ्या घरात पूरक वातावरण होते.

मुलींना अनेकदा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यास कुटुंबीय पाठिंबा देत नाहीत. परंतु, माझ्या कुटुंबातील सर्वांनीच नेहमी खूप पाठिंबा दिला. पुण्यात ब्युटी पिजेन्ट, मॉडेलिंग, रॅम्प शोज मी करीत होते, तसेच प्रिंट ॲड्‌समध्येही काम करायला मला आवडते. मला २०१४ मध्ये दिग्दर्शक गिरीश वसईकर यांच्या ‘मिस मॅच’ या चित्रपटातून ब्रेक मिळाला. यात पुण्यात शिक्षण घेत असणाऱ्या एका मॉडर्न परदेशी मुलीची भूमिका साकारली आहे. त्यानंतर ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेत काम केले आहे.

यामध्ये मिंटी या पात्राची भूमिका केली. बालाजी वर्ल्डच्या ‘पंच बीट’ या वेबसिरीजमध्ये काम केले. यात सुश्‍मिता सेनने ‘मैं हूँ ना’मध्ये जशी एका ग्लॅमरस टीचरची भूमिका केली होती, तशीच भूमिका मी साकारली आहे. तसेच, ‘एन्काउंटर’ या हिंदी चित्रपटातही मी काम केले आहे. 

दिग्दर्शक अलोक श्रीवास्तव यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मिस मसाला डोसा’ या चित्रपटाच्या शूटिंगचे काम सध्या मी पूर्ण करीत आहे. यात मी एका महिला पोलिसाचे पात्र साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर मॉडेलिंग आणि प्रिंट ॲड्‌सचेही काम सुरू आहे. ‘पंच बीट’च्या सीझन दोनचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
(शब्दांकन - गायत्री तांदळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT