Why did Sunil Barve apologize to everyone on his birthday? post viral  SAKAL
मनोरंजन

Sunil Barve: "कृपया राग धरू नका!!", वाढदिवशीच सुनिल बर्वेंनी का मागितली सर्वांची माफी?

सुनिल बर्वे यांच्यावर वाढदिवशीच माफी मागण्याची वेळ का आली? हे आहे कारण

Devendra Jadhav

सुनिल बर्वे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. सुनिल बर्वेंनी आजवर अनेक लोकप्रिय मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या. सुनिल बर्वे यांना मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन सदाबहार अभिनेते म्हणून ओळखलं जातं.

सुनिल बर्वे यांचा नुकताच वाढदिवस झाला. पण या वाढदिवशीच त्यांनी सुनिल बर्वेंनी त्यांच्या सर्व फॅन्सची माफी मागितली. काय झालं नेमकं बघा.

(Why did Sunil Barve apologize to everyone on his birthday? post viral)

सुनिल बर्वेंनी सोशल मिडीयावर वाढदिवस सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करुन सुनिल बर्वे लिहीतात, परवा ३/१०/२०२३ रोजी माझा ५७ वा वाढदिवस झाला!
अर्थातंच खूप आनंदात गेला! सर्व माध्यमांतून, प्रेम करणाऱ्या अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवले, काहींनी फोन करून तर काहींनी भेटवस्तू पाठवून, आणि काहींनी प्रत्यक्ष भेटून माझा वाढदिवस साजरा केला!! ह्या सर्वांसाठी परमेश्वराकडे कृपादृष्टीपर आशिर्वाद मागतो, आणि वैयक्तिक आभार मानतो!!

सुनिल बर्वे पुढे माफी मागताना लिहीतात, ज्यांनी व्हॅाट्सॲप वर संदेश पाठवले त्या सर्वांना त्याच दिवसात उत्तरं द्यायची असं ठरवलं होतं पण आजचा दिवस उजाडलाच!
आता आज इन्स्टा व फेसबुक ताब्यात घ्यायचं ठरंवलंय! पण हा ‘मिडिया’ इतका खोल आहे, की तळ गाठेनंच ह्याची खात्री नाहीए, तरी प्रयत्न करणार आहे.
आणि म्हणूनंच आगाऊ एक माफी मागुन ठेवतो, की मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जरी तुम्हाला उत्तर द्यायचं राहून गेलंच तरी कृपया राग धरू नका!!! (आज पर्यंत धरला नाहीएत तसाच आज आणि इथून पुढेही लोभ असू द्यावा)!!!
बघता बघता ५७ झालो हो!!

सुनिल बर्वे शेवटी लिहीतात, "ह्या आकड्यांच्या जागेची सुद्धा आदलाबदल होईल ..बघता बघता, पण तुमचा स्नेह आणि शुभेच्छा अशाच माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी असू द्या!!
वाढदिवसा निमित्त मिळालेल्या तुमच्या शुभेच्छांवर हे संपूर्ण वर्ष सुखात जाईल ह्या बद्दल शंकाच नाही! पुढल्या वाढदिवसा पर्यंत मी, तुम्हाला आवडेल असं काम करत राहीन, तुम्ही आनंद घेत रहा! पुन्हा एकदा *स ग ळ्यां चे* मनःपूर्वक आभार!!! धन्यवाद!!!"

सुनिल बर्वे लवकरच गायक सुधीर फडकेंच्या बायोपीक मध्ये झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT