shashank ketkar, shashank ketkar news, muramba serial SAKAL
मनोरंजन

सुभानअल्लाह..! Shashank Ketkar वर का आली बुरखा घालण्याची वेळ ?

शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची मालिकेतुन लोकप्रिय झाला

Devendra Jadhav

Shashank Ketkar News: अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर कायम फॅन्सच्या संपर्कात असतो. शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची मालिकेतुन लोकप्रिय झाला. शशांकचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

शशांक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. शशांकचा बुरखा परिधान करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

(why marathi actor shashank ketkar wear burkha)

शशांकने नुकतंच काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेले तीन फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

शशांकने डोळ्यात काजळ लावलं असून बुरख्याआड त्याचे डोळे दिसत आहेत.शशांकने या फोटोला काळी राणी असं कॅप्शन दिलंय. शशांक या फोटोत वेगळाच दिसत असून त्याच्या या फोटोवर त्याच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

"डोळे सुद्धा इतके सुंदर दिसत आहेत की हा तुमचाच फोटो आहे ना हे 2 वेळा पाहिलं", "बेगम साहेबांचे डोळे आवाज किती छान..

बेगम साहेबांच सुंदर शशांक तूं कोणत्याही भुमिकेत छान सुंदर दिसतोस", "खूप मस्त दिसतोस cute शशांकदा" अशा कमेंट करत शशांकच्या फॅन्सनी त्याच्या या फोटोचं कौतुक केलंय.

शशांकने बुरखा का घातला याचं उत्तर म्हणजे.. शशांक मुरांबा मालिकेत काम करतोय. मुरांबा मालिकेच्या आगामी भागाच्या शुटिंगसाठी शशांकने हा लूक केल्याचं बोललं जातंय. शशांकच्या या नवीन लूकवर त्याचे चाहते मात्र फिदा आहेत.

शशांक सध्या स्टार प्रवाह वरील मुरांबा मालिकेत अभिनय करत असून हि मालिका दुपारी १.३० वाजता स्टार प्रवाह वर पाहायला मिळेल.

शशांक काहीच दिवसांपूर्वी होळी सणाच्या निमित्ताने चर्चेत आला होता. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला शशांकने एक पोस्ट शेयर करून होळी, रंगपंचमी आणि धूलिवंदन यातला फरक सांगितला होता, सोबतच मराठी सणांचे आणि भाषेचे महत्व पटवून दिले होते.

पण या पोस्ट मधून अनेकांनी गैरसमज करून घेतल्याने शशांकने पुन्हा एक स्टोरी शेयर करून लोकांचे गैरसमज दूर केले. शशांक केतकर मराठी मालिका विश्वातला लाडका अभिनेता असून त्याच्या आजवरच्या अनेक मालिकांवर त्याच्या फॅन्सनी पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT