ShanmukhaPriya Instagram
मनोरंजन

Indian Idol 12 : शन्मुखप्रियाला का होतोय इतका विरोध?

शन्मुखप्रियाला शोमधून काढून टाकण्याची होतेय मागणी

स्वाती वेमूल

'इंडियन आयडॉल'चं बारावं indian idol 12 पर्व सध्या खूपच चर्चेत आहे. एकीकडे या शोमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणाऱ्या काही सेलिब्रिटींनी टीका केली. तर दुसरीकडे यातील स्पर्धक शन्मुखप्रियाला ShanmukhaPriya कार्यक्रमातून काढून टाकण्याची सोशल मीडियावर मागणी होतेय. शन्मुखप्रियाच्या परफॉर्मन्सवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 'शन्मुखप्रिया जुनी गाणी गाताना त्यांची अक्षरश: वाट लावते', अशा शब्दांत तिच्यावर टीका होत आहे. तर या शोमधील जुनी स्पर्धक अंजली गायकवाड तिला पुन्हा आणण्याचीही काहीजण मागणी करत आहेत. (why netizens are asking to eliminate contestant ShanmukhaPriya from indian idol 12)

शन्मुखप्रियाने आशा भोसले यांनी गायलेलं 'चुरा लिया है' हे गाणं गायलं होतं. तिने तिच्या अंदाजात हे गाणं गायल्याने काही नेटकऱ्यांना ते पटलं नाही. यावरूनच तिला ट्रोल केलं जातंय. या एपिसोडमध्ये अभिनेत्री झीनत अमान यांनी हजेरी लावली होती. "ट्रोलिंगला मनावर घेऊ नकोस. तू खूप खास आहेस. टीका करणाऱ्यांपेक्षा तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना", अशा शब्दांत झीनत अमान यांनी शन्मुखप्रियाला धीर दिला.

ट्रोलिंगला शन्मुखप्रियाचं सडेतोड उत्तर-

'मला शोबाहेर काढून टाकण्याची मागणी होतेय. पण मी ट्रोलिंगला फारसं महत्त्व देत नाही. ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत. मायकल जॅक्सनसारख्या महान कलाकारवरही टीका झाली होती. मी तर खूप लहान आहे', असं उत्तर तिने दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT