83 movie poster with Ranveer Sing and other actors. Googel
मनोरंजन

कोरोनानं '83' ची विकेट काढल्यानं निर्मात्यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची चिन्ह...

प्रणाली मोरे

भारताचा राष्ट्रीय खेळ जरी 'हॉकी' असला तरी या देशात क्रिकेटवेडे अधिक राहतात. एखाद्या सिनेस्टार इतकंच इथे क्रिकेटर्सना प्रसिद्धिचं वलय. किंबहुना त्याहीपेक्षा थोडं कांकणभर अधिकच. त्यात सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स एक छान बॉंडिंग शेअर करत आले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी क्रिकेटर्सशी लग्न करून संसारही थाटला आहे. अगदी ताजं उदाहरण द्यायचं तर आपल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या जोडीचं नाव लगेचच घेता येईल. असो हे सगळं सांगायचं कारण की आपल्या बॉलीवूडलाही 'क्रिकेट' या विषयानं पछाडलं आणि त्यातनंच निर्मिती झाली '83' ची. त्यात हे साल प्रत्येक भारतीयाच्या ह्वदयावर कोरलेलं, कारण याच वर्षी त्यावेळच्या तगड्या वेस्ट इंडिज टीमला नमवून आपल्या भारतीय क्रिकेटवीरांनी 'वर्ल्ड कप' पहिल्यांदा भारतात जिंकून आणला होता.

कबीर खान(Kabir Khan) '83' हा सिनेमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि अख्खा भारत देश सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहू लागला. रणवीर सिंग(Ranveer Singh) या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारणार ही बातमी समोर आली आणि मग चर्चेला एकच उधाण की तो कपिल देव यांच्या व्यक्तीरेखेला न्याय देईल का,शोभून दिसेल का वगैरे वगैरे. पण अखेर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय हे कळले अनं निर्मात्यांनी या बहुचर्चित सिनेमाच्या प्रदर्शनाला आणखी लांबणीवर न टांगता प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट दुबईत 'बुर्ज खलिफा' वर सिनेमाचा ट्रेलर दाखवला गेला. सिनेमा प्रदर्शित झाला. खूप प्रशंसाही झाली,सिनेमाची आणि वैयक्तिक रणवीर सिंगची देखील. पण म्हणतात न कोणाच्या नशीबात काय लिहिलेय ते सांगता येत नाही तसंच काहीसं घडलं '83' च्या बाबतीत.

सिनेमा रीलीज झाला खरा पण त्या लगोलग कोरोनाचा प्रादुर्भावही पुन्हा वाढला...देश नव्हे तर जगात कोरोनानं सर्वसामान्यांना पुन्हा फटकारायला सुरुवात केली. आणि मग काय दिल्लीत मल्टिप्लेक्स बंद करण्याचा निर्णय जाहीर झाला,मुंबईसोबतच इतर महत्त्वाच्या शहरात गर्दी टाळण्यासाठी सिनेमाचे शोज कमी करण्यास सांगण्यात आले. आणि याचा मोठा फटका '83' च्या बॉक्सऑफिस कलेक्शनला बसला. पण क्लीन बोल्ड झालेल्या '83' ला अजुनही मॅच जिंकण्याची आशा वाटतेय. सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे संकेत दिले आहेत. किमान झालेला तोटा थोडाफार का होईना भरून काढता येईल हा त्यांचा उद्देश. नाहीतर ओटीटीनंच तर तारलंय बॉलीवूडला या कोरोनाच्या काळात. आता चला '83' ही लवकरच पाहूया ओटीटीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT