tanu weds manu Esakal
मनोरंजन

Tanu Weds Manu 3: तनु पुन्हा झिंगणार मनुच्या डोक्याला ताप देणार!

Vaishali Patil

Tanu Weds Manu 3: आनंद एल राय दिग्दर्शित तनु वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटाने रिलीज होऊन आठ वर्षे पूर्ण केली आहेत. आर माधवन आणि कंगना राणौत स्टारर या चित्रपटाला प्रेक्षकांनी पार डोक्यावर घेतलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाला चाहत्यांसह स्टार्सकडूनही भरभरून दाद मिळाली.

तनु वेड्स मनु हा सर्वोत्कृष्ट चित्रपट फ्रँचायझींपैकी एक आहे. ही स्टोरी आहे एका जोडप्याची. ज्यात शांत, संयमी मनू म्हणजेच माधवन आणि उत्साही, चिडकी, धडाकेबाज तनू जी आहे कंगना राणौत. दोघांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या मनाला भिडली. गेल्या काही वर्षांत चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटाचा दर्जा मिळवला.

काल, तनू वेड्स मनू रिटर्न्स या फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागाला नुकताच आठ वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी, कंगना रणौतने तिच्या सोशल मिडियावर काही थ्रोबॅक फोटो शेअर केले ज्यात ती दिग्दर्शक आनंद एल राय देखील दिसत आहे.

या फोटोसोबतच कंगनानं दिग्दर्शकाला विशेष विनंती केली की, "जसे TWMR ने 8 वर्षे पूर्ण केली आहे. पब्लिक डिमांडनुसार मी आनंद एल राय यांना भाग या चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याची विनंती करते. क्या बोलते हो दोस्त".

या चित्रपटाबद्दल प्रेक्षक अद्याप समाधानी नसले तरी लोक त्याच्या तिसऱ्या भागाचीही वाट पाहत आहेत, या चत्रपटाबाबत माधवनने देखील वक्तव्य केलं होत.

खरं तर, सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की 'तनु वेड्स मनू' हा चित्रपट पुन्हा एकदा तिसरा भाग येणार. अशा परिस्थितीत, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, आर माधवनला पुन्हा मनूच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

तेव्हा तो म्हणाला की मूळ गोष्टी घेऊन येणे खूप कठीण आहे आणि लोकांना चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.

म्हणाला, 'जर ती एव्हेंजर्स किंवा सुपरहिरो मालिका असती तर ते सोपे झाले असतं, कारण तेव्हा तुमच्याकडे एक टेम्पलेट आहे, परंतु तनु वेड्स मनू या चित्रपटात ते अशक्य आहे. या चित्रपटासाठी मला जे काही करायचे होते ते मी केले आहे आणि आता मला पुन्हा मनू बनायचे नाही.

त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र आता पुन्हा कंगनाच्या या ट्विटमुळे चाहते पुन्हा उत्साहित झाले आहेत. कंगनानं दिग्दर्शकाला अशी आशा तिचे चाहते व्यक्त करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT