salman khan 
मनोरंजन

सलमानचा घोडा विकत देण्याच्या नावाखाली महिलेला लाखोंचा गंडा

स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. राजस्थानमधल्या एका महिलेला तीन आरोपींनी १२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. सलमान खानच्या मालकीचा घोडा विकत देऊ असं सांगत आरोपींनी तिची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

संबंधित महिलेकडून आरोपींनी ११ लाख रुपये रोख रक्कम व उर्वरीत पैसे चेकच्या माध्यमातून घेतल्याचं तिने सांगितलं. हे प्रकरण राजस्थान हायकोर्टात गेलं असता कोर्टाने महिलेला संबंधित पोलीस उपायुक्तांकडे मदत मागण्यास सांगितलं. 

निर्भय सिंह, राजप्रीत आणि अन्य एका व्यक्तीने मिळून त्या महिलेला सलमानचा घोड्यासोबतचा फोटो दाखवला. तो घोडा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं सांगत तिच्याकडून १२ लाख रुपये घेतले आणि पसार झाले. पैसे भरल्यानंतर घोडा न मिळाल्याने त्या महिलेनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतरही पुढे कोणतीच कारवाई न झाल्याने महिलेनं जोधपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाने पोलीस उपायुक्तांना याप्रकरणात महिलेला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : मुलांकडून इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करावेत: उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT