virat anushka vamika 
मनोरंजन

अनुष्का - वामिकाचं Women's Day सेलिब्रेशन; विराटने शेअर केला मायलेकींचा फोटो

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना 11 जानेवारी रोजी कन्यारत्न झाले. विराट आणि अनुष्काने ही गुड न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. दरम्यान, अनुष्का आणि विराट यांचा लेकीसोबतचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात विराट आणि अनुष्का दोघे बाळाकडे पाहात असल्याचं दिसतं. तसंच त्यानंतर अनुष्कानेसुद्धा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्या खांद्यावर बाळाचे कपडे आहेत. या फोटोला अनुष्काने 'माझी सध्याची सर्वात आवडती एक्सरसाइज' असं कॅप्शन दिले.

महिला दिनाचे औचित्य साधून विराट आणि अनुष्का यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि वामिका दिसत आहेत. मायलेकींचा फोटो शेअर करताना विराटने महिला दिनानिमित्त खास मेसेजही दिला आहे. 

'माणसाच्या आयुष्यात जन्म दिलेल्या बाळाला पाहणे हा अविश्वसनिय, आश्चर्यजनक आणि सुंदर अनुभव आहे. या अनुभवाचा साक्षीदार झाल्यानंतर महिलांचं खरं सामर्थ्य, देवत्व समजलं आणि देवाने त्यांच्यामध्ये जीव का निर्माण केला तेसुद्धा समजलं. माझ्या आयुष्यातील कणखर आणि माझा जीव असलेल्या आणि जगातील सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा' असं कॅप्शन विराटने या फोटोला दिले आहे. 

अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांनी या फोटोला लाइक करून कमेंन्टमध्ये अनुष्का आणि वामिकाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वामिकाचा जन्म झाल्यावर विराट आणि अनुष्काने वामिकाला मिडीयापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिचा चेहरा दिसू न देता विराट आणि अनुष्का वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Numerology Prediction : 'या' मूलांकाच्या लोकांना होईल धन लाभ; आयुष्यात येतील चढउतार, अंकशास्त्रानुसार तुमचा आठवडा कसा असेल? पाहा

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

SCROLL FOR NEXT