wonder woman 1984 
मनोरंजन

‘वंडर वुमन’ची बुर्ज खलिफावर जबरदस्त एंट्री, तीन वेळा बदललेल्या तारखेनंतर अखेर 'या' दिवशी होणार रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- 'वंडर वुमन १९८४' हा सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. खरं तर हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार होता. मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे हा सुपरहिरो सिनेमा तीन ते चार वेळा लांबणीवर गेला. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हा मोस्ट अवेटेड 'वंडर वुमन १९८४' सिनेमा येत्या २५ डिसेंबर रोजी जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री गॅल गेडॉटने स्वत: सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्री गॅलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या इमारतीवर 'वंडर वुमन १९८४ चा ट्रेलर झळकत आहे. या ट्रेलरमध्ये डायना प्रिंस अर्थात वंडर वुमनचे आश्चर्यचकित करणारे स्टंट्स पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या सगळ्यात चर्चित सिनेमाची रिलिज डेट चाहत्यांना सांगितली आहे. युरोप आणि अमेरिकेत हा सिनेमा १७ डिसेंबरला रिलीज झाला तर भारतात येत्या २५ डिसेंबरला 'वंडर वुमन १९८४' चाहत्यांसाठी रिलीज होणार आहे. 

‘वंडर वुमन १९८४’ हा एक महिला सुपरहिरो सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग ‘वंडर वुमन’ २०१७ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अभिनेत्री गॅल गेडॉट हिने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या जबरदस्त अ‍ॅक्शन आणि अफलातून अभिनयामुळे हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाने जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘वंडर वुमन’चा दुसरा भाग तयार करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे चाहत्यांना याची बराच काळ वाट पाहावी लागली मात्र आता अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 

wonder woman 1984 get widest screen count season makers skip 3d release gets higher share multiplexes  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT