World Cup 2023 IND vs AUS Telugu Actor Rekha Boj Commits To Run Naked On Vizag Beach If India Wins World Cup  
मनोरंजन

World Cup 2023: "भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी कपड्यांशिवाय..." अभिनेत्रीने फायनलपूर्वी केली विचित्र घोषणा!

वर्ल्ड कप फायनलपूर्वी एका साऊथ अभिनेत्रीने सोशल मिडियावर पोस्ट करत एक घोषणा केली आहे.

Vaishali Patil

World Cup 2023 IND vs AUS: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र वर्ल्ड कप 2023 चे वारे वाहत आहे. त्यातच आता भारताने नॉनस्टॉप सर्व सामने जिंकल्यामुळे भारतीयांसाठी हा वर्ल्ड कप सामना खुपच उत्सुकतेचा ठरणार आहे.

आता वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना खुपच दिमाखदार पद्धतीने पार पाडणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे सर्व क्रिकेटप्रेमी भारताने हा सामना जिंकावा म्हणुन आपआपल्या पद्धतीने प्रार्थना करत आहेत तर काहींनी पब्लिसिटी स्टंट सुरू केले आहेत.

त्यातच आता एका साउथ अभिनेत्रींने देखील भारत जिंकल्यानंतर ती काय करणार याची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरु झाली आहे. तिची घोषणा ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना पुनम पांडेची आठवण झाली आहे.

तेलुगू अभिनेत्री रेखा बोज असं या अभिनेत्रींचे नाव आहे. तिने सोशल मिडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, जर टीम इंडियाने 2023 चा वर्ल्ड कप जिंकला तर ती विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर कपड्यांशिवाय फिरेल.

सध्या रेखाची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देखील देत आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे तर अनेकांनी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी कृती करणे लाजिरवाणी बाब असल्याचे म्हटले आहे.

तसच यापुर्वी 2011 मध्ये अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेने देखील असेच वचन दिले होते की जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ती न्यूड फोटोशूट करेल. सध्या वर्ल्ड कपचा फिवर असल्यामुळे अभिनेत्रींच्या अशा अनेक विचित्र प्रस्तावाच्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यापुर्वी एका मॉडेलने मोहम्मद शमीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तर दुसरीकडे एका पाकिस्तानी अभिनेत्रीने बांंग्लादेशच्या टिमला वचन दिले होते की जर त्यांनी भारताचा पराभव केला तर ती त्यांच्यासोबत डिनरला जाईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना रविवारी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT