world cup 2023 payal ghosh proposed cricketer mohammad shami for marriage on this condition  Esakal
मनोरंजन

world cup 2023: प्रसिद्ध अभिनेत्रीनं मोहम्मद शमीला आधी थेट लग्नाची मागणी घातली अन् आता..

Vaishali Patil

Mohammad Shami: सध्या भारतात एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 खेळला जात आहे. सर्वत्र वर्ल्ड कपचा उत्साह मिळत आहे. त्याच भारतीय संघाने सुरुवातीपासून दमदार खेळ करत आता उपांत्य फेरीतही जागा मिळवली आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघाचा अप्रतिम फलंदाज मोहम्मद शमी सध्या खुप चर्चेत आहे.

त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना थक्क केले आहे. वर्ल्डकपमध्ये त्याची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. त्याने विक्रमही आपल्या नावावर केले. त्यामुळे सोशल मिडियावर फक्त शमीची चर्चा रंगली आहे. इतकच नाही तर शमीला आता थेट एका अभिनेत्रीने लग्नाची मागणी घातली आहे. तिने शमीला प्रपोज केले मात्र शमीसोबत लग्न करण्यासाठी एक खास अट सांगितले आहेत.

मोहम्मद शमीला प्रपोज करणारी अभिनेत्री आहे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल घोष.

पायलने काही दिवसांपुर्वी एका ट्विट शेयर केले होते. भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यावेळी शमीने गोलंदाजीने हा सामना जिंकवला. त्यानंतर पायलने ट्विट करत शमीला प्रपोज केलं होतं.

तिने ट्विट करून लिहिले की, 'शमी, तू तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.' त्यानंतर हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले.

इतकच नाही तर पायलने आता पुन्हा एक ट्विट केलं होत ज्यात तिने लिहिले होते की, 'मोहम्मद शमी, उपांत्य फेरीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुला माझ्याकडून काय मदत हवी आहे . आम्हाला पहिले फायनलमध्ये जागा मिळवायची आहे. तू हिरो व्हावं अशी माझी इच्छा आहे.'

सध्या पायलचे हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता नेटकरी तिची चेष्टा करत आहेत. ती खरचं शमीची चाहती झाली आहे की फक्त पब्लिसीटीसाठी हे ट्विट करत आहेत असा सवाल नेटकरी विचारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT