WPL 2024 
मनोरंजन

WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीगचा ग्रँड ओपनिंग समारंभ; 'हे' कलाकार लावणार हजेरी

WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीगचा ग्रँड ओपनिंग समारंभ लवकरच पार पडणार आहे.

priyanka kulkarni

WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीगचा (Women's Premier League 2024) दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी (23 फेब्रुवारी) बेंगळुरू (Bengaluru) येथील एम चिन्नास्वामी (M Chinnaswamy Stadium) स्टेडियम येथे होणार आहे. या सोहळ्यामध्ये अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन हे बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेते वुमन्स प्रीमियर लीग उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावणार आहेत. वुमन्स प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया आऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वुमन्स प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच काही फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि कार्तिक आर्यन दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, "ये किंडम नहीं, क्विनडम हैं, वुमन्स प्रीमियर लीगचा ओपनिंग समारंभ पाहा" 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल.

सिद्धार्थ मल्होत्रा पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिने 2023 मध्ये WPL च्या ओपनिंग सोहळ्यात परफॉर्म केलं होतं. अभिनेता किर्ती सॅनन आणि गायक एपी धिल्लन यांनीही त्यावेळी परफॉर्म केलं.

कधी होणार वुमन्स प्रीमियर लीगचे सामने?

वुमन्स प्रीमियर लीगच्या स्पर्धेतील पहिले 11 सामने बेंगळुरू येथे खेळले जातील. यानंतर, पाच संघ दिल्लीला येतील, जिथे एलिमिनेटरसह अंतिम सामना खेळला जाईल. लीग राउंडमध्ये 20 सामने खेळले जातील आणि त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल. यावेळी या लीगचे यजमानपद बेंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT