Yami Gautam, Aditya Dhar  instagram/Yami Gautam
मनोरंजन

'लार्जर दॅन लाइफ' संकल्पनेला छेद देणारा यामीचा पारंपरिक विवाहसोहळा कसा होता?

यामीच्या वडिलांनी फक्त एक दिवस आधी वेडिंग प्लॅनरला लग्नाबद्दल सांगितलं होतं

प्रियांका कुलकर्णी

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) 4 जून रोजी दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्नगाठ बांधली. आदित्य धरच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये यामीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या दोघांच्या लग्न समारंभाला त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनीच उपस्थिती लावली होती. यामीच्या हिमाचल प्रदेश मधील मंडी या भागातील फार्म हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. वेडिंग प्लॅनर गीतेश शर्मा यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीत यामी आणि आदित्यच्या लग्नसोहळ्याबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहे.(Yami Gautam Aditya Dhar wedding ceremony wedding planner reveals details)

गीतेश शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 'यामीच्या वडिलांनी लग्नाच्या एक दिवसआधी मला संपर्क केला होता. लग्न विधीसाठी बिलासपूर आणि हमीरपूर इथून त्यांचे कुटुंबीय आणि पंडित आले होते. इतर सेलिब्रिटींप्रमाणे लार्जर दॅन लाइफ आणि ग्लॅमरस पद्धतीचा सोहळा त्यांना नको होता. त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पडाव्यात, असं त्यांचं मत होतं. देवधर वृक्षाजवळ यामी-आदित्यच्या लग्नाचे विधी पार पडले. झेंडुची फुलं आणि केळीच्या पानांनी लग्नमंडप सजवण्यात आला होता. लग्नानंतर संध्याकाळी छोट्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. तर फार्महाऊसच्या अंगणातच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.'

लग्नाचे फोटो यामीने सोशल मीडियावर शेअर केले होते. आदित्यने देखील त्याच्या अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले. त्या दोघांना अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा, कंगना राणावत, अभिनेता विक्रांत मेस्सी यांनी यामी आणि आदित्यला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT