Yashoman Apte play lead role in shubhvivah serial on star pravah sakal
मनोरंजन

Yashoman Apte: अभिनेता यशोमन आपटे इमेज ब्रेक भूमिकेत, रोमॅंटिक हीरो ते..

स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेत साकारणार मानसिक स्थैर्य गमावलेला आकाश..

नीलेश अडसूळ

yashoman apte new serial: सुप्रसिद्ध अभिनेता यशोमन आपटेला याआधी आपण रोमॅण्टिक हिरोच्या रुपात पाहिलं आहे. मात्र आजवर त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि आव्हानात्मक पात्र तो स्टार प्रवाहची नवी मालिका शुभविवाह मध्ये साकारणार आहे. १६ जानेवारी पासून दुपारी दोन वाजता सुरु होणाऱ्या या नव्या मालिकेत यशोमन मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशची भूमिका साकारणार आहे.

या आव्हानात्मक भूमिकेविषयी सांगताना यशोमन म्हणाला, ‘आतापर्यंत मालिकेत मी रोमॅण्टिक हिरो साकारला आहे. मात्र शुभविवाह मालिकेतील ही भूमिका खऱ्या अर्थाने इमेज ब्रेक करणारी ठरेल. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी वर्कशॉप आहे.'

पुढे तो म्हणाला की, ''आकाशने मानसिक स्थैर्य गमावलं आहे. त्यामुळे वयाने मोठा असला तरी तो लहान मुलासारखा वागतो. आकाशच्या अश्या वागण्यामागे एक कारण दडलेलं आहे. हे कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पहावी लागेल. आकाश साकारताना नवनव्या गोष्टी आत्मसात करत आहे. म्हटलं तर ही भूमिका साकारण्यासाठी बंधन आहेत आणि म्हण्टलं तर नाही. आकाश कोणत्या गोष्टीवर कश्या पद्धतीने व्यक्त होईल हे समजून घेऊन सीन करावा लागतोय. प्रत्येक सीननंतर या पात्रावरची पकड घट्ट होतेय. स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझी पहिलीच मालिका आहे त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे.' असे तो म्हणाला.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

'शुभविवाह' या मालिकेत यशोमान सोबतच अभिनेत्री कुंजिका काळविंट, मधुरा देशपांडे, विशाखा सुभेदार, विजय पटवर्धन असे दमदार कलाकार प्रमुख भूमिकेत आहे. या निमित्ताने एक वेगळी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT