Lata Saberwal, Lata Saberwal news, yeh rishta kya kehlata hai SAKAL
मनोरंजन

Lata Saberwal: ये रिश्ता क्या केहलाता है फेम लोकप्रिय अभिनेत्रीला गंभीर आजार, आवाज गमावण्याची भीती

लता यांना गंभीर आजार झाल्याचं निदान झालं आहे

Devendra Jadhav

Lata Sabharwal News: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री लता सभरवाल यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी.

लता यांना गंभीर आजार झाल्याचं निदान झालं असून त्यांचे फॅन्स काळजीत पडले आहेत. लता सभरवाल यांनी ये रिश्ता क्या केहलाता है मालिकेत अभिनय केलाय..

(yeh rishta kya kehlata hai fame actress lata sabharwal dignosed with throat nodules )

लता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, 'मी माझ्या घशासाठी ENT स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेले होते(डोळा कान आणि घसा तज्ञ). माझ्या घशात गुठळ्या आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मला आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मला स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत. यासाठी हे आवश्यक आहे. ही खूप गंभीर समस्या आहे, यावर उपचार न केल्यास माझा आवाज कायमचा जाऊ शकतो. अशी पोस्ट लता यांनी लिहून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केलंय.

अभिनेत्री लता सभरवाल यांनी 1999 मध्ये 'गीता रहस्य' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेल्या लता यांनी सूरज बडजात्या यांना 'विवाह' चित्रपटातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

पण सिनेमाआधीच लता यांना टीव्ही इंडस्ट्रीत अफाट लोकप्रियता मिळाली. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही शोमध्ये अक्षराच्या आईच्या भूमिकेत लोकांनी तिच्यावर खूप प्रेम केले. या शोच्या माध्यमातून लता यांना प्रत्येक घराघरात ओळखले गेले.

'ये रिश्ता क्या कहलाता है' पूर्वी यांनी 'जन्नत' या टीव्ही शोमध्ये नाजची भूमिका साकारली होती. या शोमध्येही त्यांना खूप पसंती मिळाली होती.

यानंतर त्यांनी जय महाभारत, कहता है दिल, शकलाका बूमबूम, अर्जू है तू, आवाज-दिल से दिल तक, देवी, दिशान, खुशीयान, वो रहने वाली महलों की, नागिन, घर एक सपना, सीआयडी, मैं तेरी परछाई हूं अशा सिनेमात अभिनय केलाय.

याशिवाय नच बलिए 6, वो अपना सा, इश्क में मरजावा, ये रिश्ते हैं प्यार के शोमध्ये काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

IPL 2026: राजस्थान एक्स्प्रेसला अधिक संधी सातत्याचा अभाव असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळली,नजर कैदेत ठेवलेले शिवसैनिक आक्रमक

Gadchiroli News: सेंद्रीय शेती, किचन गार्डनच्या माध्यमातून नेहारपायली पुढे; गावाचा एकोपा यशाची गुरुकिल्ली; सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

Pavangad Fort Shivling Discovery : पावनगडावरील दर्ग्याखालील ढिगाऱ्यात सापडलं एक फूट रुंदीचं पुरातन शिवलिंग, किल्ल्यावरील प्राचीन हिंदू संस्कृतीचा वारसा अधोरेखित!

SCROLL FOR NEXT