मनोरंजन

'ही' अभिनेत्री काेराेना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातून परतली घरी, नेमके काय कारणं असेल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगभरात काेराेना विष्णाुने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वजणच काेराेनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यात सामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटीदेखील अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ये रिश्ता क्या कहलाता हैं या मालिकेतील मोहेना कुमारी हिला काेराेनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तिच्यावर ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते. परंतु मोहेना सध्या काेराेना पॉझिटिव्ह असतानाही ती घरी परतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहेनाने स्वतः ही माहिती सांगितली आहे.

मोहेना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे. सतपाल यांना काेराेना विषाणूची लागण झाली होती. परिणामी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची काेराेनाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये मोहेनासह आणखी १७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
 
सुरवातीला मोहेनाने ती काेराेना पाॅझिटीव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यानंतर मोहेनावर ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर मोहेना काेराेनातून पुर्णपणे बरी झालेली नसतानाही घरी परतली. त्यावेळी मोहेनाने सोशल मीडियावर असे सांगितले, 'मी रुग्णालयातून घरी आले आहे. परंतु अजुनही मी काेराेना मुक्त झालेली नाही. मी पूर्णपणे बरी झालेली नाही. मी आताही काेराेना पॉझिटिव्हचं असून सध्या आयसोलेशनमध्ये आहे. मी गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयातच होते. पाच दिवसांपूर्वीच काेराेनाची लागण झाली होती. आम्हां सर्वांना बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. सर्वजण काेराेनाच्या नियमांचं पालन करणार आहोत. यावर लवकरच यशस्वीरित्या मात करणार आहे. आता आम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पहिल्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत अशी माहिती मोहेना कुमारीने घरी आल्यानंतर इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

महिलांनो.. ही बातमी खास तुमच्यासाठी; घरबसल्या पैठणी जिंकण्याची संधी मिळणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT