esakal | महिलांनो.. ही बातमी खास तुमच्यासाठी; घरबसल्या पैठणी जिंकण्याची संधी मिळणार...
sakal

बोलून बातमी शोधा

home minister

लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही; मात्र अशा वेळी घरबसल्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळाली तर....

महिलांनो.. ही बातमी खास तुमच्यासाठी; घरबसल्या पैठणी जिंकण्याची संधी मिळणार...

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही; मात्र अशा वेळी घरबसल्या महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळाली तर.... निश्चितच त्यांना आनंद होणार आहे.

मोठी बातमी ः निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश 

महिलांसाठी ही आनंदाची बातमी घेऊन आला आहे होम मिनिस्टर हा कार्यक्रम. झी मराठीवरील या लोकप्रिय कार्यक्रमात घरच्या घरी महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. आता होम मिनिस्टरचे नवीन एपिसोड्स दाखविण्यात येणार आहेत. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे. 'घरच्या घरी' या विशेष सेगमेंटमध्ये आदेश बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत. 'वर्फ फ्रॉम होम' या प्रकारात कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं आहे.

मोठी बातमी ः डॉक्टरसाहेब... माझ्या मुलाला शिंक आली, कोरोना तर नसेल ना?

होम मिनिस्टर या कार्यक्रमाला आता जवळपास पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचे हे सोळावे वर्षे आहे. सन 2004 मध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि हळूहळू हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय ठरला. सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमामधील गंमत दिवसेंदिवस वाढवीत नेली. या कार्यक्रमामुळे तमाम वहिनीसाहेबांचे ते लाडके भावोजी ठरले. सध्या चित्रीकरण बंद असल्यामुळे काही जुने भाग या कार्यक्रमाचे दाखवण्यात येत होते. परंतु आता 'वर्क फ्राम होम' या प्रकारात चित्रीकरण सुरू झाले आहे. आदेश बांदेकर व्हिडीओ कान्फरन्सिंग संपर्क साधणार आहेत आणि प्रश्न विचारणार आहेत. 

मोठी बातमी ः पावसाळ्यात दहिसरला पूराचा धोका; मेट्रोने अद्याप पूर्ण नाही केले काम

याबाबत आदेश बांदेकर म्हणाले की एका वेळेला फक्त एकाच कुटुंबामध्ये जाता येत होते. आता लॉकडाऊनमुळे कुटुंबाच्या अनेक सदस्यांना भेटता येत आहे. आता सगळे आपापल्या घरात आहेत. आता मी माझ्या घरातून थेट सगळ्या घरात फिरून येत आहे. सध्या सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशा अवस्थेमध्ये होम मिनिस्टर सगळीकडे आनंद पसरविणार आहे.

loading image