Vrushika Mehta Wedding Esakal
मनोरंजन

Vrushika Mehta Wedding: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम वृषिका मेहता अडकली लग्न बंधनात!

टीव्ही अभिनेत्री वृषिका मेहताने तिचा प्रियकर सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे.

Vaishali Patil

Vrushika Mehta Wedding: सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु आहे. सर्व सामान्यापासून ते कलाकरांपर्यंत अनेक लोक आपल्या जोडीदारासोबत लग्नबंधनात अडकत आहे. रविवारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री मुक्ती मोहनने तिचा प्रियकर कुणाल ठाकूरसोबत लग्न केले. त्यानंतर आता पुन्हा एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

'दिल दोस्ती डान्स' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोद्वारे चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वृषिका मेहता हिची वेगळी ओळख देण्याची गरज नाही. ती खुप लोकप्रिय आहे. अभिनयासोबतच वृषिकाने डान्सने लोकांना वेड लावले आहे. वृषिका आता लग्न बंधनात अडकली आहे. वृषिका मेहताने तिचा प्रियकर सौरभ घेडियासोबत लग्न केले आहे.

वृषिका मेहताने तिचा बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. वृषिका मेहता-सौरभ घेडियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वृषिका मेहताने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. फोटो कॅप्शनमध्ये एक संस्कृत श्लोक "भवद्भिः सह सङ्गतिः आजीवनं तिष्ठतु... सर्वेषु कार्येषु सफलतां जनयतु।" लिहिला आहे. वृषिकाने यापुर्वी तिच्या एंगेजमेंटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. वृषिका आणि सौरभने 11 डिसेंबर 2022 रोजी साखरपूडा केला होता.

वृषिकाने हेवी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर सौरभने राखाडी शेरवानी घातली होती. या व्हायरल फोटोंमध्ये दोघांच्या कुटुंबाची झलकही दिसली आहे. वृषिकाचा नवरा सौरभ घेडिया हा टोरंटोमध्ये राहतो. वृषिका सौरभला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटली होती. वृषिकाने अहमदाबादमध्ये एंगेजमेंट केली होती.

वृषिका मेहताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'दिल दोस्ती डान्स', 'ये है आशिकी', 'इश्कबाज' आणि 'ये तेरी गलियाँ' सारख्या मालिकेत दिसली आहे. वृषिका शेवटची 'कुमकुम भाग्य'मध्ये दिसली होती. सध्या तिचे फोटो व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT