Lataa Saberwal
Lataa Saberwal 
मनोरंजन

'यापुढे मालिकांमध्ये करणार नाही काम'; 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधल्या अभिनेत्रीची घोषणा

स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत गेल्या दहा वर्षांपासून राजश्री माहेश्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सबरवालने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे 'डेली सोप' म्हणजेच मालिकांमध्ये काम करण्याची घोषणा लताने सोशल मीडियावर केली आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित लताने तिचा हा निर्णय चाहत्यांना कळवला आहे. 

'मी अधिकृतरित्या जाहीर करतेय की, मी मालिकांमध्ये काम करणं बंद करतेय. पण वेब सीरिज, चित्रपट किंवा एखाद्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेची संधी मिळाल्यास मी ती नक्की स्वीकारेन. माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या डेली सोप्सचे मी आभार मानते', असं लताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय, असं म्हणत तिने ही पोस्ट लिहिली. 

२०१९-२०२० मध्ये 'ये रिश्ते है प्यार के' या मालिकेतही लताने राजश्री माहेश्वरीची भूमिका साकारली होती. लताने 'विवाह', 'इश्क विश्क', 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. 'ये रिश्ता..' मालिकेत काम करतानाच लताने सहकलाकार संजीव सेठशी २०१० मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आहे. 

लता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून फिटनेस, लाइफस्टाइल यांसंदर्भातले व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. १९९९ पासून ती मालिकांमध्ये काम करत असून 'वो रहनेवाली महलों की', 'शका लका बुम बुम', 'वो अपना सा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT