Aditi Sarangdhar  
मनोरंजन

'येऊ कशी..' फेम अदिती सारंगधरचा सोशल मीडियापासून ब्रेक

चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

स्वाती वेमूल

'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Me Nandayla ही झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये मालविका ही नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती सारंगधर Aditi Sarangdhar कलाविश्वात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अदितीसुद्धा सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. पण सध्या तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अदितीने एक पोस्ट लिहित चाहत्यांना याविषयीची माहिती दिली. (Yeu Kashi Tashi Me Nandayla actress Aditi Sarangdhar takes a break from social media)

'सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. सध्यासाठी बाय, लवकरच भेटू', अशी पोस्ट तिने लिहिली आहे. अदितीने अचानक सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. याआधीही अनेक सेलिब्रिटींनी विविध कारणांसाठी सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेतला. काहींनी ट्रोलिंगला वैतागून तर काहींनी स्वत:ला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला.

सध्या अदिती 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील भूमिकेमुळे चर्चेत असते. या मालिकेत ती शाल्व किंजवडेकर, अन्विता फलटणकर, दिप्ती केतकर आणि शुभांगी गोखले यांच्यासोबत भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT