Shalva Kinjawadekar  
मनोरंजन

'येऊ कशी..'मधल्या ओमकारची रिअल लाइफ गर्लफ्रेंड; पोस्ट केले रोमँटिक फोटो 

सकाळ ऑनलाइन

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील ओमकार व स्वीटू यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. मालिकेत जरी ओमकारच्या मनात स्वीटूविषयी प्रेम फुलत असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्याचं प्रेम एका तरुणीवर जडलंय. ओमकारची भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर हा श्रेया डफळापूरकरला डेट करत असून त्यांच्या रिलेशनशिपला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त शाल्वने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केले आहेत. 

श्रेयासोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करत शाल्वने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही त्याने श्रेयासोबतचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. श्रेया ही स्टायलिस्ट असून तिचा स्वत:चा फॅशन लेबलसुद्धा आहे. सध्या 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे शाल्व प्रकाशझोतात आला असून सोशल मीडियावरील त्याचा चाहतावर्गसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर स्वीटूची भूमिका साकारतेय. 

शाल्वने 'हंटर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१५ पासून तो या क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत त्याने मालिका व वेब सीरिजमध्येही काम केलंय. झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत तो शुभांगी गोखलेंच्या मुलाची भूमिका साकारतोय. श्रीमंत मुलगा आणि गरीब कुटुंबातील मुलगी यांच्यातील प्रेमकहाणी या मालिकेत दाखवण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT