shalv 
मनोरंजन

'वडापाव'वरून खिल्ली उडवणाऱ्यांना 'ओमकार'चं उत्तर

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील ओमकार सोशल मीडियावर चर्चेत

स्वाती वेमूल

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla या लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर अभिनेता शाल्व किंजवडेकरनं Shalv Kinjavdekar पदार्पण केल आणि बघता बघता तो आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मालिकेप्रमाणेच शाल्वच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे. शाल्वच्या मते पहिल्याच मालिकेत दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूप आनंददायक आहे. सध्या मालिकेत स्वीटू आणि ओमचं प्रेम बहरताना दिसतंय. मात्र मालिकेतील ओमकारच्या एका संवादावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. ओमकारने त्याच्या आयुष्यात वडापाव कधीच खाल्ला नसल्याचं स्वीटूला सांगतो आणि त्याच्या या वाक्यावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले. त्यावर आता शाल्वने प्रतिक्रिया दिली आहे. (yeu kashi tashi mi nandayla fame omkar aka shalv kinjavdekar reacts to trolls and memes)

ट्रोलिंगबद्दल शाल्व म्हणाला, "ट्रोलिंग हासुद्धा एक प्रसिद्धीचा भाग आहे. प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणूनच ते ट्रोल करतात. मालिकेवर जे मीम्स येतात ते मी वाचतो. ते वाचून छान वाटतं की आपल्या मालिकेची चर्चा होतेय."

मालिकेत काम करतानाचा अनुभव

याआधी शाल्व हा चित्रपट आणि वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण मालिका या माध्यमाबद्दल आणि त्यात काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना शाल्व म्हणाला, "हा खूप वेगळा अनुभव आहे. याआधी चित्रपट किंवा सीरिजमध्ये मी भूमिका साकारल्या आहेत. पण मालिकेत काम करताना खरंच खूप मजा येतेय. मालिकेची गोष्ट पुढे सरकते तसं पात्र उलगडत जातं. त्या पात्राला वेगवेगळे कंगोरे मिळत जातात. पुढे काय होणारे हे माहिती नसताना कथानकाप्रमाणे बदलणाऱ्या पात्राची मजा अनुभवता येतेय. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी मालिकेत कधी काम केलं नसल्यानं माझ्यासाठी ते आव्हान ठरेल असं मला वाटलं. पण मालिकेच्या निर्मात्यांना भेटल्यानंतर, तिथला परिसर, वातावरण, सेट सगळंच इतकं छान होतं की मी लगेच होकार दिला."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जिथं भविष्याची स्वप्नं पाहिली त्याच शाळेने माझ्या मुलीचा जीव घेतला, चिमुकलीच्या आईचा मन हेलावणारा टाहो!

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT