Anvita Phaltankar 
मनोरंजन

वजनाबाबत ट्रोल करणाऱ्यांवर 'स्वीटू'ने व्यक्त केली नाराजी

"आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडतो."

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' yeu kashi tashi mi nandayla मधील स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर anvita phaltankar हिने तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अन्विता फलटणकर एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. मालिकेचा एकंदरीतच असलेला विषय आणि स्वीटूची व्यक्तिरेखा ही बऱ्याच मुलींना खूप जवळची वाटणारी आहे. वजनावरून सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी मुलींना ट्रोल करणाऱ्यांवर अन्विताने नाराजी व्यक्त केली आहे. (yeu kashi tashi mi nandayla fame sweetu aka anvita phaltankar talks about trolling)

"मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे", असं अन्विता म्हणाली.

मालिका किंवा चित्रपटांत काम करायचं म्हटलं तर अभिनेत्री ही सुंदर आणि सुडौल बांध्याचीच असली पाहिजे, या विचाराला आता अनेक मालिकांनी छेद दिला आहे. अगदी गुबगुबीत दिसणारी मुलगीसुद्धा मुख्य नायिकेची भूमिका साकारू शकते, हे हल्लीच्या मालिका किंवा चित्रपट पाहिले तर सहज स्पष्ट होतं. अन्वितानेही तिच्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अन्विताने याआधी काही मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. 'टाइमपास' या चित्रपटात तिने केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. तर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गर्ल्स' या चित्रपटात अन्विताने रुमीची भूमिका साकारली होती. तिने नाटकांतही काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT