shalv 
मनोरंजन

ओमची उडवली जातेय खिल्ली; मालिकेची सोशल मीडियावर चर्चा

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील ओमचा संवाद चर्चेत

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' yeu kashi tashi mi nandayla ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर या मालिकेची आणि त्यातील कलाकारांची चर्चा होत असते. या मालिकेत सध्या ओमकार आणि स्वीटूमधील प्रेम बहरतंय. स्वीटूने तिच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर या कथेत सध्या रोमँटिक वळण आल्याचं पहायला मिळतंय. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमुळे ओमकारला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातंय. (yeu kashi tashi mi nandayla omkar trolled on social media)

या एपिसोडमध्ये स्वीटू आणि ओम डेटवर जातात. मात्र हे दोघं जिथे जिथे जातात, तिथे कोणी ना कोणी ओळखीचे दिसतात. म्हणून स्वीटू अखेर ओमला वडापाव खाण्यासाठी घेऊन जाते. गाडीतून प्रवास करत असताना स्वीटू ओमला विचारते, तुला कुठला वडापाव आवडतो? ओमकारने त्याच्या आयुष्यात वडापाव कधीच खाल्ला नसल्याचं सांगतो. त्याच्या या वाक्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जातेय.

मुंबईत राहत असलेल्या प्रत्येकाने कधी ना कधी बटाटा वडा किंवा वडापावची चव नक्कीच चाखलेली असते. त्यामुळे ओमचं हे वाक्य नेटकऱ्यांच्या पचनी पडत नाहीये. त्याच्या या संवादावरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. रंजक कथानक आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेतील ओमकार आणि स्वीटूची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. यामध्ये अभिनेता शाल्व किंजवडेकरने ओमची तर अभिनेत्री अन्विता फलटणकरने स्वीटूची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT