झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yevu Kashi Tashi Me Nandayla) या मालिकेनं एक वर्षानंतर अखेर प्रेक्षकांचा निरोप घेण्याचं ठरवलं आहे. गेले अनेक दिवस मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या खरंतर येतच होत्या. मालिकेचा ढासळत जाणारा टीआरपी हे एक महत्त्वाचं कारण पुरेसं असतं मालिका बंद करण्यासाठी. मालिका चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत असं काही नाही. मालिकेत वेगवेगळे ट्रॅक आणून पाहिलं गेलं पण त्यानं काही हवं तसं काम केलं नाही आणि अखेर झी वाहिनी सोबत मालिकेच्या निर्मात्यांनीही निर्णय घेऊन मालिका आटोपती घ्यायचं ठरवलं. २० मार्च रोजी ही मालिका बंद होत असून या मालिकेच्या जागी नवीन मालिका आपल्याला पहायला मिळणार आहे. पण तरीही मालिकेतील स्वीटू-ओम हे जोडपं मात्र कायम लक्षात राहिल. असं जोडपं अभावानाच प्रेमात पडलेलं आपण याआधी पाहिलं असेल कदाचित.
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेचा पहिला प्रोमो आठवतोय का? खरंतर एवढी जाडी मुलगी लीडची भूमिका करणार,ही मालिकेची हिरॉइन आहे, हे जेव्हा कळालं तेव्हा काहींनी नावं ठेवली. पण काहीजण म्हणाले,'काहीतरी वेगळं नक्की पाहू'. त्यात जेव्हा मालिकेतल्या हिरोला पाहिलं तेव्हा तर वाटलं हे विजोड जोडपं घेतल्यावर मालिका चालेल का. पण खरंतर तसं झालं नाही. गेल्या काही महिन्यापूर्वी पर्यंत म्हणजे अगदी स्वीटू-ओम प्रेमात पडेपर्यंत आणि त्यानंतर काही दिवसांपर्यंत मालिकेत खूपच इंटरेस्टिंग ट्रॅक पहायला मिळत होते. मालिकेचा टीआरपी चांगला होता. अनं प्रेक्षकांनी त्यांची उत्तम साथ मालिकेला दिली होती. पण स्वीटू-मोहीत च्या लग्नापासून,मालविकाच्या विचित्र वागण्याच्या अनेक गोष्टी नव्यानं अॅड केल्या गेल्या आणि सगळं फसत गेलं. पुढे शुभांगी गोखले यांनी मालिका सोडली. एकामागून एक गोष्टी घडत गेल्या आणि सगळं बिनसलं. असो आता मालिका निरोप घेतेय हे कन्फर्म झालं एकदाचं.
ही मालिका २० मार्च रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतेय. आज यानिमित्तानं मालिकेत स्वीटूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्विता फलटणकरनं एक भावूक पोस्ट केलेली आहे. त्यात तिनं म्हटलंय,''आणखी एक चॅप्टर संपत आहे''. सोबत तिनं ओम म्हणजे शाल्वसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. ज्यात तो गुबगुबीत गालाच्या अन्विताचे गालगुच्चे घत आहे. या तिच्या पोस्टवर ओम आणि स्वीटूच्या चाहत्यांनी मात्र भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे,'आम्ही तुम्हाला मिस करू', तर काहींनी तर चक्क म्हटलंय,'येऊ कशी तशी मी नांदायला पार्ट २ घेऊन पुन्हा या'...तर असो,आता स्वीटू आणि ओम २० मार्चला मालिकेच्या माध्यमातून निरोप घेत असल्यानं त्यांचा चाहतावर्ग जरी नाराज असला तरी अपेक्षा आहे एका नवीन वळणावर दोघेही नव्या भूमिकेत दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.