Honey Singh Esakal
मनोरंजन

Honey Singh: 'आता माझी सटकली..', अपहरणाच्या गंभीर आरोपानंतर हनी सिंगने पोस्ट करत धमकीच दिली

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मालकाने रॅपर हनी सिंगवर धक्कादायक आरोप करत एफआयआर दाखल केला. यानंतर आता खुद्द हनी सिंगने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग आजकाल त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे चर्चेत आहे. मात्र त्यापेक्षा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतच त्याच्या टिना थडानीसोबतच्या ब्रेकअपच्या बातमीने चर्चा सुरु झाली.

अलीकडेच, रॅपर आणि त्याच्या टीमविरुद्ध इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या मालकाचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंग आणि इतरांविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.

या प्रकरणाची खुप चर्चा रंगली होती. आता त्यानंतर अनेकांनी हनी सिंगवर टिका देखील केली. मात्र आता रॅपरने या बातम्यांवर मौन सोडले आहे. आपल्याविरुद्धच्या करण्यात आलेल्या सर्व तक्रारी खोट्या असून त्या निराधार असल्याचा दावा त्यांनी केला.

हनी सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर करत लिहिले की, 'तक्रार आणि आरोप खोट्या आणि निराधार आहेत. मिडिया जे दाखवत आहे त्याचा म्हणजेच माझी कंपनी किंवा तक्रारदार यांच्यात कोणताही संबंध किंवा करार नाही आहे.

मी मुंबईस्थित ट्राईब वाइब या कंपनीत परफॉर्म करायला गेलो होतो, जी बुक माय शो या सुप्रसिद्ध कंपनीचाच एक भाग आहे. या कार्यक्रमात मला जितका वेळ देण्यात आला होता तेवढाच मी परफॉर्म केला आहे.

पुढे या पोस्टमध्ये हनी सिंगने त्याच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात ठोस पावलं उचलणार असल्याचं सांगितलं आहे. आहे. त्यांची कायदेशीर टीम आरोपींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा विचार करत आहे. असंही त्याने सांगतिले आहे.

त्यांने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ' हे सर्व आरोप खोटे असून माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी माझी कायदेशीर टीम आधीच कार्यरत आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT