Yodha: Sidharth Malhotra Lands in Kullu for Film’s Shoot Shares Video of Mesmerising View sakal
मनोरंजन

'योद्धा'च्या चित्रीकरणासाठी सिद्धार्थ मल्होत्रा कुल्लूमध्ये दाखल..

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या शूटिंग मध्ये प्रचंड व्यस्त असून बॉलीवुड मधील अनेक चित्रपटांमध्ये तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नीलेश अडसूळ

sidharth malhotra : सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून पदार्पण केले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याच्या सुमारे एक दशकाच्या कारकिर्दीत सिद्धार्थने 'कपूर अँड सन्स', 'मरजावां', 'एक व्हिलन', 'ब्रदर्स', 'इत्तेफाक', 'हसी तो फसी', 'बार बार देखो' आणि 'शेरशाह' असे अनेक चित्रपट त्याने केले. आता तो चित्रीकरणासाठी 'कुल्लू' येथे रवाना झाला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये त्याच्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'योद्धा'चे चित्रीकरण सुरू आहे.

इंस्टाग्राम स्टोरीवर, सिद्धार्थने 'योध्दा'च्या चित्रीकरणासाठी जात असताना कुल्लूमध्ये उतरतानाचा व्हिडिओ शेअर केला. या चित्रपटात दिशा पटानी आणि राशि खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार असून सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी दिग्दर्शित केला आहे तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने निर्मिती केली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. २०२१ मध्ये सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर योध्दाचा टीझर पोस्ट केला होता.

सध्या सिद्धार्थ,अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'थँक गॉड' च्या रिलीजची तयारी करत आहे. हा कॉमेडी चित्रपट टी-सीरीज आणि मारुती इंटरनॅशनल यांच्या निर्मितीसह इंद्र कुमार यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. हा एक जीवनपट म्हणून ओळखला जातो. थँक गॉड २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. जॅकलीन फर्नांडिससोबत अक्षय कुमारच्या राम सेतूसोबत बॉक्स ऑफिसवरही टक्कर पाहायला मिळणार आहे. याशिवाय सिद्धार्थ रश्मिका मंदान्नासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या आगामी वेब सीरिजमध्येही तो दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT