Yodha Trailer esakal
मनोरंजन

Yodha Trailer: ठरलं! सिद्धार्थच्या 'योद्धा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

Yodha Trailer: नुकतीच सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करुन योद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट चाहत्यांना सांगितली आहे.

priyanka kulkarni

Yodha Trailer: बहुप्रतिक्षित 'योद्धा' (Yodha) या ॲक्शन-पॅक चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. नुकतीच सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करुन योद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट चाहत्यांना सांगितली आहे.

कधी रिलीज होणार 'योद्धा'चा ट्रेलर?

सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा लिखित आणि दिग्दर्शित 'योद्धा' या चित्रपटाचं नुकतेच एक पोस्टर सिद्धार्थनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थच्या हातात बंदुक दिसत आहे. या पोस्टरला सिद्धार्थनं कॅप्शन दिलं, "सीटबेल्ट बांधा, कारण योद्धाचा ट्रेलर चार दिवसांनी येत आहे!" सिद्धार्थनं शेअर केलेल्या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दुबईमध्ये रिलीज झालं पोस्टर

दुबईमध्ये स्काय डायव्हिंग करुन योद्धा या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. सिद्धार्थ एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये काही लोक एरियल स्टंट करताना दिसले. या व्हिडीओला सिद्धार्थ कॅप्शन दिलं, "थेट तुमच्या स्क्रीनवर थ्रिल्स एअरड्रॉपिंग! तुम्हा सर्वांसोबत या प्रवासाला निघताना खूप आनंद होत आहे."

कधी रिलीज होणार योद्धा?

सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ हा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राशि खन्ना आणि दिशा पटानी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

करण जोहर योद्धा या चित्रपटाचा निर्माता आहे. हा सिनेमा 15 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT