yog yogeshwar jay shankar serial big twist shankar majaraj left his antapur village sakal
मनोरंजन

Datta Jayanti 2O22: सुरू होतोय नवा अध्याय.. शंकर महाराज अंतापूर सोडणार पण..

'योग योगेश्वर जय शंकर' मालिका रंजक वळणावर..

नीलेश अडसूळ

Yog Yogeshwar Jay Shankar: सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'योगयोगेश्वर जय शंकर'.. या मालिकेतून शंकर महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली असून एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आला आहे. आज दत्त जयंती निमित्त एक महत्वाचा भाग दाखवण्यात येणार आहे.

आजवर आपण शंकर महाराजांच्या बाल रूपातील लीला पाहिल्या. अनेकांना महाराजांनी दृष्टांत दिला. अनेकांना तारले तर अनेकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली. त्यामुळे प्रेक्षकांचेही या मालिकेशी भावनिक नाते जुळले आहे. अशातच मालिकेने एक रंजक वळण घेतले असून बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार आहे. हा आध्यात्मिक टप्पा आज दत्त जयंती निमित्त दाखवण्यात येणार आहे.

शंकर जाताना चिमणाजी – पार्वती या दांपत्याना जुळे मूल होण्याचा नआशीर्वाद देतो. त्यानुसार त्यांना मुलं होतात. तो त्यांचे घराचे कल्याण करतो. शिवाय गावातीलही अनेकांच्या मनोकामना पूर्ण करतो. त्यामुळे शंकर गाव सोडून जातानाचा क्षण प्रेक्षकांना भावुक करणार आहे.

या मालिकेत आपण पाहत आलो आहोत की गावचा सावकार का पहिल्या पासूनच शंकर महाराजांच्या विरोधात आहे. तो महाराजांना सगळ्या पद्धतीने त्रास देऊन पाहतो, पण त्याचा काहीही परिणाम होत नाही. अगदी बालशंकर गांव सोडून जाणार ही माहीत असतानाही सावकार कुरघोड्या थांबवत नाही. पण अखेर बालशंकर त्यांनाही त्यांच्या चुकांची जाणीव करून देतो. आणि ते दोघेही बालशंकरच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतात. ज्यांनी आजवर बालशंकरला त्रास दिला ते कसे शरण जातील ही आजच्या भागात कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT