seema deo ramesh deo love story esakal
मनोरंजन

Seema Deo Passes Away: 'तुला पाहते रे तुला पाहते'; रमेश देव-सीमा देव यांच्या चिरतरुण प्रेमाची सुरवात कशी झाली ?

सकाळ डिजिटल टीम

मराठी आणि हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्याच वर्षी त्यांचे पती रमेश देव यांचे निधन झाले होते. रमेश देव यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) (Seema Deo) यांच्यासोबत विवाह केला. रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्या वयात 14 वर्षांचे अंतर होते. या दोघांनी 'जगाच्या पाठीवर' या चित्रपटात पहिल्यांदा सोबत काम केल्याचे पाहायला मिळाले. (Ramesh Deo Seema Deo Love Story)

रमेश देव (Ramesh Deo )यांनी 1950 मध्ये मराठी चित्रपटातून (Marathi Movie) आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी काही हिंदी चित्रपटात सह कलाकाराच्या भूमिकेत काम केले. त्यांची चित्रपट कारकिर्दी बहरत असताना दुसऱ्या बाजूला नलिनी सराफ यांनी आपली ओळख निर्माण केली होती. चित्रपटासाठी त्यांनी सीमा या नावाने कारकिर्दीला सुरुवात केली 1960 मध्ये 'जगाच्या पाठीवर' या मराठी चित्रपटातून या जोडीनं एकत्र काम केले. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

1962 मध्ये त्यांनी 'वरदक्षिणा' या चित्रपटात ही जोडी पुन्हा झळकली. या चित्रपटापासूनच दोघांच्या नात्यातील प्रेम फुलण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी अभिनय क्षेत्रातील नावजलेली जोडीनं विवाहही थाटला. 2013 मध्ये या जोडीच्या विवाहाला 50 वर्षे पूर्ण झाली होती. 50 वर्षानंतरही त्यांच्या नात्यातील गोडवा एखाद्याला हेवा वाटावा असाच होता. रमेश देव यांनी 280 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT