Yusuf Ibrahim Important name for alia ranbir wediing Google
मनोरंजन

युसुफ इब्राहिम कोण आहे? आलिया रणबीरच्या लग्नाशी का जोडला जातोय संबंध...

रणबीर आणि आलिया अखेर आज म्हणजेच १४ एप्रिल,२०२२ रोजी मिस्टर अॅन्ड मिसेस कपूर्स झाले.

प्रणाली मोरे

आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचं(Ranbir Kapoor) लग्न हा सध्याचा हीट अॅन्ड हॉट विषय आहे. आज १४ एप्रिल,२०२२ रोजी हे लव्हबर्ड्स लग्नबंधनात अडकले आहेत. यांच्या लग्नाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीची मोठी चर्चा रंगलेली आपण पाहिली. लग्नाच्या वेन्यूपासून,मेन्यूपर्यंत ते अगदी सिक्युरिटीपासून गेस्टलिस्टपर्यंत साऱ्याची माहिती मीडियानं रणबीर आलियाच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. हे मोठं सेलिब्रिटी लग्न मुंबईतच होत असल्यामुळे अर्थातच सुरक्षा कडक असणार हे तर आलंच. चक्क २०० बाऊन्सर्स आणि पोलिसही तैनात असलेले बान्द्र्याच्या वास्तू इमारतीजवळ दिसून आले. तरीदेखील गोंधळ उडताना दिसून आलाच कारण गर्दीच एवढी तोबा होती. पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही याचं क्रेडिट इथल्या २०० बाऊन्सर्सना द्यायला हवं. यामध्येच सध्या एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे युसुफ इब्राहिम(Yusuf Ibrahim). कोण आहे तो? रणबीर आलियाच्या लग्नाशी त्याचा काय संबंध.

Yusuf Ibrahim(Security officer) with alia bhatt

तर हा युसुफ इब्राहिम आहे, ज्यानं आलिया रणबीरच्या लग्नसोहळ्याच्या सुरक्षेव्यवस्थेची जबाबदारी पेलली होती. युसुफ हा आलियाचा जवळचा खास माणूस आहे. तो कायम आलियाच्या सोबत अनेक कार्यक्रमांना दिसतो,तिच्या सुरक्षेची जबाबदारी पेलताना. युसुफ हा ९११ या सिक्युरिटी एजन्सीमध्ये पार्टनर आहे. आलिया भट्टचा सावत्र भाऊ राहूल भट्टने युसुफ लग्नाची सुरक्षा व्यवस्था पहाणार आहे असे याआधी स्पष्ट केले होते. युसुफनं आपल्या कंपनीच्या जवळजवळ २०० बाऊन्सर्सना या लग्नसोहळ्यासाठी तैनात केलं होतं. राहुल भट्टनं त्याच्या टीममधीलही काही मुलांना सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी युसुफकडे पाठवलं होतं असं तो म्हणाला.

पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी खास ड्रोन कॅमेरा आणि पेट्रोलिंग करणाऱ्या ऑफिर्सचीही लग्नात सोय करण्यात आली होती. आलिया रणबीरला त्यांच्या लग्नात खास बाऊन्सर्स हवे होते,जे धुम्रपान करणारे नसतील,त्यांची पर्सनॅलिटी चांगली असेल,वागण्या-बोलण्यात संयम अन् मृदुता असणारे असतील. युसुफ आणि त्याच्या ९११ टीमनं वरुण धवनच्या लग्नातही अलिबागला सुरक्षेची जबाबदारी पेलली होती. युसुफ हा सिक्युरिटी कन्सलटंट आहे. शाहरुख खान,करण जोहर,दीपिका पदूकोण,शाहिद कपूर,कतरिना कैफ,रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासाठीही युसुफ सिक्युरिटी व्यवस्था पाहतो. आलिया सोबत अनेकदा प्रमोशनच्या निमित्तानं किंवा ती ट्रॅव्हल करताना युसुफ दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT