dangal 
मनोरंजन

हम पे थोड़ी दया तो करो हम नन्हे बालक है 

वृंदा चांदोरकर

दंगल चित्रपट हिट झाला आणि काही नवीन चेहऱ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यातलेच एक नाव म्हणजे 'झायरा वासिम'. दंगल चित्रपटात 'धाकड' अशा छोट्या गीता फोगटचे काम करणाऱ्या झायराची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांबरोबरच समिक्षकांचेही लक्ष या बालकलाकाराने वेधून घेतले. 

झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर काश्मीरमधील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे सोळा वर्षे वयाची झायरा सध्या सोशल मिडियावरही चर्चेत आहे. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांनी सोशल मीडियावरून धमक्या दिल्यानंतर झायराने सोशल मीडियावरच माफी मागितली. कट्टरतावाद्यांना 'युथ आयकॉन' म्हणून झायरा नको आहे, तर हातात दगड घेतलेले तरूण हवे आहेत. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांच्या धमक्यांनंतर अवघा देश झायराच्या बाजूने उभा राहिला आहे. 

असे असले तरी तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. चित्रपटातील तिच्या हरियाणवी लहेजामुळे तर ती नक्की कुठली असा प्रश्न अनेकांना पडला. झायरा ही मुळ श्रीनगरमधील हवल (जम्मू- काश्मिर) येथील. सेंट पॉल सोनवर या मिशनरी शाळेत तिचे शिक्षण झाले. झायराच्या घरचे वातावरणही अगदी साधे असल्याचे ती सांगते. तिचे वडील बॅंकेत आहेत तर आई शाळेत शिक्षिका आहे.

चित्रपटात पदार्पण करण्याआधी झायराने काही जाहिरातींमध्ये भूमिका साकारल्या होत्या. परंतु, टीव्ही ते मोठा पडदा हा प्रवासही तिच्यासाठी सोपा नव्हता. तिच्या एका नातेवाईकांच्या सांगण्यावरुन झायरा मुंबईला चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली. त्यावेळी तिला नेमके आपण कोणत्या चित्रपटासाठी ही ऑडिशन देत आहोत हे देखील माहित नव्हते. शिवाय ऑडिशन जवळजवळ सहा महिने चालली. शेवटी दहा हजार मुलींमध्ये दंगल चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी छोट्या गीतासाठी झायराची निवड केली.

चित्रपटासाठी निवड झाल्यानंतरही झायराला या भूमिकेसाठी चांगलेलच कष्ट घ्यावे लागले. हा प्रवास चांगलाच कठीण असल्याचे ती सांगते. कारण या भूमिकेसाठी तिला खास कुस्तीचे प्रशिक्षण घ्यावे लागले. ''माझी निवड झाली. पण या भूमिकेसाठी मी खूपच बारीक दिसत होते. त्यामुळे मी कुस्तिगीर दिसण्यासाठी मला माझ्या शरीरयष्टीवर चांगलेलच काम करावे लागले,'' झायरा सांगते.        

चित्रपटातील पदार्पण हा देखील एक योगायोगच असल्याचे ती सांगते. तिच्या घरच्यांची तिने अभिनयाच्या क्षेत्रात यावे यासाठी पसंती नव्हती. ''मला खरंतर अभिनयाची आवड नव्हती. मी कधी विचारही केला नव्हता की मी एखाद्या चित्रपटात काम करेन, हा खरंतर नशीबाचा भाग आहे,'' असं ती सांगते. 

दंगलच्या यशानंतर आमीरच्या अगामी 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात देखील झायरा असणार आहे. 

झायरा वासिम
जन्मः 23 ऑक्टोबर 2000
बालपण 
- हवल (श्रीनगर) येथे जन्म
- श्रीनगरमधील सेंट पॉल सोनवर मिशनरी शाळेत शिक्षण
- वडील बॅंकेत आहेत तर आई शाळेत शिक्षिका
शिक्षण
- झायराने नुरतिच दहावीची परिक्षा दिली आहे.
आगामी चित्रपट 
- 'सीक्रेट सुपरस्टार'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT