Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Esakal
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection: कासवाच्या वेगानं जरा हटके जरा बचके ची हाफ सेंच्यूरी....

Vaishali Patil

'जरा हटके जरा बचके' या विकी कौशल आणि सारा अली खानच्या चित्रपटानं प्रेक्षकांच खुप मनोरंजन केले. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच विकी आणि सारा अली खानची जोडी ऑनस्क्रीन दिसली असून प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे.

2 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा आज 11 वा दिवस आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटासाठी मागील वीकेंड खूप चांगला ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईच्या आकडे निर्माते आणि स्टार्ससाठी फायदेशीर आहे. चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त कमाईचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे.

आता या चित्रपटाच्या दहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. या शनिवार आणि रविवारी विकेंडमुळे चित्रपटाच्या कमाईच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली होती.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या रविवारच्या कलेक्शन बद्दल काही पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार 'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या 10व्या दिवशी म्हणजेच रविवारी 7.2 कोटी रुपयांचे ग्रँड कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 53.55 कोटींवर गेली आहे.

अवघ्या 40 कोटींमध्ये बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने शेवची ५० कोटींचा आकडा पार करत असून बॉक्स ऑफिसवर तो हिट चित्रपटांच्या यादित नाव कोरल आहे.

या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान व्यतिरिक्त इनामुलहक, सुष्मिता मुखर्जी, नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT