ZHZB Box Office Collection Day 2 Esakal
मनोरंजन

ZHZB Box Office Collection Day 3: विकी-साराची जोडी हिट की फ्लॉप? विकेंडला जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

सारा अली खान आणि विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने रिलीज होताच रेकॉर्ड करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून तिसर्‍या दिवशीचे कलेक्शन उत्कृष्ट आहे. जाणून घ्या चित्रपटाने वीकेंडला किती कलेक्शन केले.

Vaishali Patil

ZHZB Box Office Collection Day 3: विकी कौशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विकी आणि साराची धमाल जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. कपिल आणि सोम्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल आहे. कारण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचं कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे.

शुक्रवारी म्हणजेच 2 जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तीन दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन उत्कृष्ट आहे.

सुमारे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाईचा आकडा पुर्ण करेल अशी आशा आहे. कारण

आता या चित्रपटाने निम्म्याहून अधिक बजेट पुर्ण केले आहे. आता वीकेंडला या चित्रपटानं किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत.

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेड रिपोर्टनुसार, 'जरा हटके जरा बचके' ने रिलीजच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच रविवारी 9 कोटी रुपयांचं कलेक्शन केले आहे.

'जरा हटके जरा बचके'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.49 कोटींचे जबरदस्त कलेक्शन केले तर शनिवारी 7.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, विकी आणि साराच्या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडची एकूण कमाई आता 21.69 कोटींवर गेली आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट सारा आणि विकी कौशल या स्टार्सशिवाय नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी सहाय्यक भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्रेकर यांनी केले आहे. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर लोकांना खूप आवडला होता. त्याचबरोबर दोघही कलाकरांनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खुप मेहनत घेतली होती.

'जरा हटके जरा बचके' हा विकी कौशलचा दुसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. विकीचा पहिला सर्वात मोठा ओपनर चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' होता. तर दुसरीकडे साराचा 'सिम्बा', 'लव्ह आज कल 2' आणि 'केदारनाथ' नंतर ही चौथा मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT