Zareen Khan Compare Katrina Kaif impact her career esakal
मनोरंजन

Zareen Khan : 'कतरिनामुळे माझं करिअर संपलं, बॉलीवूडनं मला कधीही...!

झरीननं थेटपणे कतरिनाचे नाव घेत तिच्यामुळे आपल्याला मोठी किंमत मोजावी लागल्याचे म्हटले आहे.

युगंधर ताजणे

Zareen Khan Compare Katrina Kaif impact her career : बॉलीवूडचा भाईजानच सलमान खाननं २०१० मध्ये एका अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला. सुरुवातीला तिला पाहून सगळ्यांनी ही तर कतरिनाची कॉपी आहे. असे म्हटले. सलमानची लाडकी अभिनेत्री म्हणूनही तिच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. झरीन खान हे त्या अभिनेत्रीचे नाव. आता तिनं धक्कादायक खुलासा केला आहे.

सलमानसोबत वीर या चित्रपटातून झरीन खाननं डेब्यू केलं होतं. त्यानंतर आणखी काही चित्रपटांमध्येही ती दिसली होती. केवळ कतरिना सारखी दिसते म्हणून झरीन खानला बॉलीवूडमध्ये चित्रपट मिळणे बंद झाले. असे तिनं काही मुलाखतींमधून स्पष्टपणे सांगितले. झरीननं थेटपणे कतरिनाचे नाव घेत तिच्यामुळे आपल्याला मोठी किंमत मोजावी लागल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर झरीन आणि कतरिना यांची नेहमीच तुलना होताना दिसते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

झरीन आणि कतरिना या दोघीही दिसायला सारख्या म्हणून त्यांच्यात नेहमीच तुलना होत राहिली. यासगळ्यावर झरीननं काही धक्कादायक खुलासे केले आहे. आस्क मी एनिथिंग सेशनच्या दरम्यान तिनं चाहत्यांशी संवाद साधला आहे. त्यात तिनं आपण वीर, रेडी आणि हाऊसफुल २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले आहे. तुम्ही मला माझ्या चित्रपटाशी संबंधित प्रश्न विचारु शकता असे चाहत्यांना म्हटल्यावर तिला जे प्रश्न विचारण्यात आले त्यावर झरीनला स्पष्टपणे बोलावेच लागले.

झरीन म्हणाली, मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा एका अल्लड मुलीसारखी होते. माझे बॅकग्राउंड काही चित्रपटाशी संबंधित नव्हते. त्यामुळे की काय माझी तुलना कतरिनासोबत व्हायला लागली. मी तर तिची चाहती होते. पण तिचा मोठा परिणाम माझ्या करिअरवर झाला. मला चित्रपट मिळणे बंद झाले. हे मला ठामपणे सांगावे लागेल. त्यामुळे की काय मला बॉलीवूडमधून चित्रपट मिळाले नाहीत.

झरीनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाल्यास तिनं हेट स्टोरी ३, अक्सर २ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय गिप्पी ग्रेवालसोबत काही पंजाबी चित्रपटांतही ती दिसली आहे. त्यात जट जेम्स बाँड सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हम भी अकेले तुम भी अकेले हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

एक-दोन नाही सात दिवसात शूट केलाय गोंधळ सिनेमाचा 25 मिनिटांचा वनटेक सीन !

SCROLL FOR NEXT