Zareen Khan hospitalised after dengue, shares pic in hospital and gives health updates salman khan SAKAL
मनोरंजन

Zareen Khan: सलमान खानची हिरोईन झरीन खान हॉस्पीटलमध्ये दाखल, समोर आलं मोठं कारण

सलमान खानसोबत काम केलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री झरीन खानला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय

Devendra Jadhav

Zarine Khan News: डेंग्यूमुळे अभिनेत्री जरीन खानला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार झरीन ताप आणि अंगदुखीने ग्रस्त होती आहे. बुधवारी तिने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट शेअर केले.

(Zareen Khan hospitalised after dengue)

झरीनने हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांना तिच्या आरोग्याबद्दल अपडेट केले. झरीनने चेहऱ्याची कोणतीही झलक न दाखवता फळांच्या रसाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये जोडले, “#RecoveryMode”. तिने यापूर्वी हॉस्पिटलमधील एक फोटो देखील शेअर केला होता ज्यामध्ये ती IV हे लिक्विड घेताना दिसली होती.

झरीनने 2010 मध्ये आलेल्या वीर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ज्यामध्ये तिने राजकुमारीची भूमिका केली होती. सलमान खानने या सिनेमाच्या माध्यमातुन झरीनला लॉंच केलं. नंतर, 2011 च्या कॉमेडी-ड्रामा रेडीमध्ये सलमानसोबत कॅरेक्टर धीला या लोकप्रिय डान्स नंबरमध्ये अभिनय केल्यानंतर झरीन खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. याशिवाय हाऊसफुल 2 या सुपरहिट सिनेमात झरीन खान झळकली. याशिवाय, झरीनने हेट स्टोरी 3, अक्सर 2, 1921 अशा इतर अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

2021 मध्ये झरीनचा शेवटचा सिनेमा रिलीज झालेला. मग झरीनने अभिनय सोडला अशी चर्चा सुरु झाली.

मग पुढे आईच्या तब्येतीमुळे चित्रपटांमधून ब्रेक घेतल्याचे स्पष्ट करून झरीनने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “माझी आई आता बरी आहे. ती १००% बरी नाही, तिची तब्येत सतत बदलत राहते. पण, जेव्हाही तिच्यासोबत चांगले दिवस येतात तेव्हा मला आनंद होतो."

दरम्यान झरीनचे चाहते तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT