Zarina Wahab on Sooraj Pancholi’s acquittal in Jiah Khan case say family will lead a normal life finally after 10 years viral  Esakal
मनोरंजन

Zarina Wahab: 'माझ्या मुलानं दहा वर्षांपासून नीट खाल्लं नाही..', सुरज पांचोलीच्या निर्दोष मुक्ततेवर आईची प्रतिक्रिया

Vaishali Patil

Zarina Wahab On Sooraj Pancholi: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु होती. या प्रकरणात जिया खानचा प्रियकर सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. सूरज पांचोलीला दिलासा मिळाला आहे.

दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने सुरजची पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती एएस सय्यद यांचा हा निर्णय पुराव्याआभावी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

यानिकालानंतर बऱ्याच समिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. काहींनी  सूरज पांचोलीला पाठिंबा दिला तर काहींनी या निकालाला विरोध केला. या प्रकरणात जियाची आई राबिया ही हाय कोर्टात जाणार असल्याच तिने सांगितलं आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणात आता सूरज पांचोलीची आई जरीना वहाब ही कोर्टात सूरजच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, ज्येष्ठ अभिनेत्री जरीना वहाब यांनी या निकालाबद्दल बोलले आणि 10 वर्षांनंतर तिला 'कृतज्ञ आणि आराम' वाटत असल्याच सांगितल आहे.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत जरीना म्हणाली की तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू परत आले आहे आणि कुटुंबाला अखेर 'सामान्य' वाटत आहे. “अन्यथा, शेवटी न्यायाचा विजय होईल या आशेने आम्ही सर्व खोटे आरोप दहा वर्ष सहन केले आणि आता ते झाले!” त्याच बरोबर त्यांनी सांगतिले की ते आता तिच्या मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा विचार करत आहेत. कारण “त्याने दहा वर्षांपासून नीट खाल्ले नाही. तो आता पुन्हा त्याचं आयुष्य जगेल." असंही त्या म्हणाल्या.

तर दुसरीकडे जिया खान प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुरजनेही सोशल मीडियावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली होती. सुरजने सोशल मीडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या यात त्याने लिहिलं होत की, "सत्याचा नेहमीच विजय होतो. हा निर्णय यायला १० वर्ष लागले. या काळात मी जो वेळ घालवलाय तो खूप वेदनादायी आणि रात्रीची झोप उडवणारा आहे. आज मी केवळ ही केस जिंकलो नाही तर माझ्यातला आत्मविश्वास मी परत मिळवला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

Asaduddin Owaisi : मुस्लिमांनी नेतृत्व निर्माण करावे

IND vs NZ 1st ODI : विराट कोहली प्रेक्षकांवर भडकला! Rohit Sharma बाद झाल्यावर जे घडलं, ते अपेक्षित नाही; त्याला कसला राग आला?

Prajakt Tanpure:सत्ताधाऱ्यांचे हिंदुत्व बेगडी: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यावर कारवाई करा !

Dog Attack : फुरसुंगीत भटक्या श्वानाचा एकवीस जणांना चावा

SCROLL FOR NEXT