Zee Chitra Gaurav 2023 nomination list
Zee Chitra Gaurav 2023 nomination list sakal
मनोरंजन

Zee Chitra Gaurav 2023: कुणाला मिळणार 'झी चित्र गौरव' २०२३ पुरस्कार.. नामांकन यादी जाहीर..

नीलेश अडसूळ

मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा 'झी चित्र गौरव' 2023 लवकरच होणार आहे, या सोहळ्याचे वेध सध्या कलाकारांसह प्रेक्षकांनाही लागले आहेत. यंदाच्या सोहळ्यात खूप काही खास असणार आहे, विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरही या मंचावर आपला डान्स सादर करणार आहेत. याशिवाय विनोदाची आतिषबाजी हा तर या सोहळ्याचा मुख्य भाग असतोच.

पण यंदा कुणाला हा पुरस्कार मिळणार हे बघणे उत्कंठावर्षक आहे. त्यासाठी नामांकन यांनी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ रविवार २६ मार्च संध्या झी मराठीवर प्रक्षेपित होणार आहे.

 चित्रपटांसाठी ह्या वर्षी परीक्षक म्हणून यांनी काम पहिले, ते मृणाल कुलकर्णी, केदार शिंदे आणि विद्याधर पाठारे यांनी. या दिग्गजांनी पुरस्कारासाठी नामांकनं दिली आहेत. ती पुढील प्रमाणे..

सर्वोत्कृष्ट रंगभूषा -  धर्मवीर - विधाधर भट्टे, मी वसंतराव - सौरभ कापडे, झोंबिवली - यास्मीन रॉजर्स

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - हर हर महादेव - नचिकेम त बर्वे, मी वसंतराव - सचिन लोवलेकर, सर सेनापती हबीरराव - मानसी अत्तरदे

सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - चंद्रमुखी - दीपाली विचारे - आशिष पाटील, सर सेनापती हंबीरराव - उमेश जाधव, झोंबिवली - रंजू वर्गीस, अनन्या - फुलवा खामकर, वेड - रंजू वर्गीस

सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण -   गोदावरी - बेलॉन फोन्सेका,  मी वसंतराव - अनमोल भावे, झोंबिवली - लोचन कानविंदे               '

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - गोदावरी - ए.व्ही. प्रफुल्लचंद्र, मी वसंतराव - सारंग कुलकर्णी, सौरभ भालेराव, झोंबिवली – ए.व्ही. प्रफुल्लचंद्र                  

सर्वोत्कृष्ट गीतकार - गोदावरी - जितेंद्र जोशी, एकदा काय झाल - संदीप खरे डॉ सलील कुलकर्णी, वेड - अजय- अतुल, चंद्रमुखी - गुरु ठाकूर              

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - वेड - श्रेया घोषाल, चंद्रमुखी - आर्या आंबेकर, अनन्या - मुग्धा कऱ्हाडे, चंद्रमुखी - श्रेया घोषाल,  मी वसंतराव - प्रियांका बर्वे              

सर्वोत्कृष्ट गायक- धर्मवीर - मनीष राजगिरे, गोदावरी - राहुल देशपांडे , एकदा काय झाल - शंकर महादेवन,  मी वसंतराव - राहुल देशपांडे,   पांडू - अवधूत गुप्ते              

सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शन - एकदा काय झाल -सलील कुलकर्णी, वेड - अजय अतुल,       चंद्रमुखी - अजय - अतुल,  मी वसंतराव - राहुल देशपांडे, पांडू - अवधूत गुप्ते

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन - गोदावरी - अमित वाघचौरे, हर हर महादेव - सतीश चिपकर/राकेश कदम/सचिन पाटील, मी वसंतराव - अशोक लोकरे/ए.रुचा , सर सेनापती हंबीरराव - मदन माने,   वेड - दुर्गेश महापात्रा/निलेश वाघ                  

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - सर सेनापती हंबीरराव - महेश लिमये, गोदावरी - शमीन कुलकर्णी, वेड - भूषणकुमार जैन,  मी वसंतराव - अभिमन्यू डांगे, झिम्मा - संजय मेमाणे              

सर्वोत्कृष्ट संकलन- सर सेनापती हंबीरराव - मयूर हरदास, गोष्ट एका पैठणीची - मनीष शिर्के, मी वसंतराव - फैजल महाडिक - इम्रान महाडिक, अनन्या - अभिजीत देशपांडे , Y - जयंत जठार  

सर्वोत्कृष्ट कथा - गोदावरी - प्राजक्त देशमुख - निखिल महाजन, गोष्ट एका पैठणीची - शंतनू रोडे, अनन्या - प्रताप फड, एकदा काय झाल - सलील कुलकर्णी

सर्वोत्कृष्ट पटकथा - गोदावरी - निखिल महाजन - प्राजक्त देशमुख,   मी वसंतराव - निपुण धर्माधिकारी, Y - डॉ. अजित सूर्यकांत वाडीकर- स्वप्नील सोज्वळ, गोष्ट एका पैठणीची - शंतनू रोडे              

सर्वोत्कृष्ट संवाद - गोदावरी - प्राजक्त देशमुख,   गोष्ट एक पैठणीची - शंतनू रोडे,  मी वसंतराव - उपेंद्र शिधये / निपुण धर्माधिकारी                            

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - गोदावरी - सानिया भंडारे, एकदा काय झाल - अर्जुन पूर्णपात्रे,  वेड - खुशी  हजारे, गोष्ट एका पैठणीची - आरव शेट्ये, बालभारती - आर्यन मेंघाजी      

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - वेड - जिया शंकर , सर सेनापती हंबीरराव - श्रुती मराठे, गोदावरी - गौरी नलावडे, एकदा काय झाल - उर्मिला कानेटकर, मी वसंतराव - अनिता दाते          

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - धर्मवीर - क्षितीश दाते, सर सेनापती हंबीरराव - गश्मीर महाजनी, गोदावरी - संजय मोने, मी वसंतराव - पुष्कराज चिरपुटकर,  अनन्या - अमेय वाघ              

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - गोष्ट एका पैठणीची - सायली संजीव, अनन्या - हृता दुर्गुळे, Y - मुक्ता बर्वे, चंद्रमुखी - अमृता खानविलकर, तमाशा लाईव्ह - सोनाली कुलकर्णी, वेड - जिनिलिया देशमुख

सर्वोत्कृष्ट अभिनेता - गोदावरी - जितेंद्र जोशी, धर्मवीर - प्रसाद ओक,  एकदा का झाल - सुमीत राघवन,  वेड - रितेश देशमुख,  मी वसंतराव - राहुल देशपांडे

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - गोदावरी - निखिल महाजन, गोष्ट एका पैठणीची - शंतनू रोडे,   मी वसंतराव - निपुण धर्माधिकारी, Y - डॉ.अजित वाडीकर, अनन्या - प्रताप फड, वेड - रितेश देशमुख

सर्वोत्कृष्ट चित्रपट -  गोदावरी,.   मी वसंतराव, Y , गोष्ट एक पैठणीची,   वेड  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT