dr babasaheb ambedkar, babasaheb ambedkar, jai bhim, zee yuva SAKAL
मनोरंजन

Jai Bhim: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नवी मालिका.. घुमणार 'जय भीम'चा नारा

झी युवाने त्यांच्या इंस्टाग्रामर रिलीज केलाय

Devendra Jadhav

Jai Bhim News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिलला जगभरात साजरी होणार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा दिवस.

याच आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून झी युवा वर नवीन मालिका सुरु होतेय. या मालिकेचा प्रोमो नुकताच झी युवाने त्यांच्या इंस्टाग्रामर रिलीज केलाय. मालिकेचं नाव जय भीम.

(zee yuva new serial Jai Bhim promo launch which based on life of dr. babasaheb ambedkar)

या प्रोमोत डोळ्यावर चष्मा चढवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान घेऊन चालत असतात. बाहेर असंख्य सामान्य माणसं आंबेडकरांची वाट पाहत असतात.

आंबेडकर सर्वांना अभिवादन करतात. लोकं त्यांच्या नावाचा जयघोष करतात.

अशाप्रकारे या मालिकेचा जबरदस्त प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या प्रोमोत आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

जय भीम एका महानायकाची गाथा! असं या मालिकेचं नाव असून मानवतेच्या सन्मानाची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कथा बघायला मिळणार आहे.

आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच १४ एप्रिल पासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता हि मालिका झी युवा वर बघायला मिळेल.

मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार आणि आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

झी युवा लवकरच पूर्वी सारख्या उत्तोत्तम मालिका घेऊन या स्वागत आहे तुमचं.. कोविड नंतर झी युवाची पहिली मालिका.. Wow, प्रत्येक पिढीसाठी असणारे आदर्श व्यक्तिमत्व... अशा शब्दात जय भीम एका महानायकाची गाथा! मालिकेचं स्वागत केलंय.

आता कधी एकदा १४ एप्रिलला हि मालिका सुरु होतेय याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

फुलपाखरू, बन मास्क या झी युवावरच्या गाजलेल्या मालिकांनंतर आंबेडकर जयंती निमित्त सुरु होणाऱ्या जय भीम एका महानायकाची गाथा! या मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT