Zeenat Aman Bollywood Actress Eye Surgery esakal
मनोरंजन

Zeenat Aman : अभिनेत्री जीनत अमान यांच्यावर शस्त्रक्रिया, गेल्या ४० वर्षांपासून त्या आजाराशी सुरु होती झुंज

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे.

युगंधर ताजणे

Zeenat Aman Bollywood Actress Eye Surgery : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच जीनत अमान यांच्या एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. खरं तर मागील ४० वर्षांपासून जीनत अमान यांना डोळ्यांचा एक दुर्धर आजार जडल्याचे सांगण्यात येत होते. अखेर त्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जीनत या पीटोसिस नावाच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यानंतर आता त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या जीनत अमान या त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. जीनत अमान यांनी रुग्णालयातून दोन फोटो शेयर केले असून त्यात त्यांनी आपल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये जीनतजी म्हणतात की, गेल्या ४० वर्षांपासून मी त्याकडे लक्ष दिलेलं नाही. १८ मे २०२३ रोजी मी वोग इंडियासाठी एक फोटोशुट केले होते.

त्या ४० वर्षांमध्ये मी एका आजाराला सामोरी गेले. आता त्या आजाराला अलविदा म्हणण्याची वेळ आली आहे. पीटोसिस असे आजाराचे नाव आहे. काही वर्षांपासून माझ्या उजव्या डोळ्याला या आजारानं खूपच त्रस्त केले होते. त्या सगळ्याचा मोठा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला होता. असेही जीनतजी यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ज्यांचे करिअर चेहरा आणि डोळ्यांवर केंद्रित असते त्यांना त्याविषयी खूपच जागरुक राहावे लागते. त्यामध्ये काही बदल झाल्यास त्याचा होणारा परिणाम किती भयानक असतो हेही समजून घेणे महत्वाचे आहे. असेही जीनतजींनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर खडे बोल

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT