Zeenat Aman Bollywood Actress Gosspis effect Anxiety  esakal
मनोरंजन

Zeenat Aman: 'लोकांना बोलायला काय जाते, पण आम्हाला किती त्रास होतो याचा विचार कुणी करतं का?' जीनत अमान स्पष्टच बोलल्या!

७० ते ८० च्या दशकांत आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या जीनत अमान यांच्या नावाची त्यावेळी मोठी क्रेझ होती.

युगंधर ताजणे

Zeenat Aman Bollywood Actress Gosspis effect Anxiety : बॉलीवूडच्या सेलिब्रेटींविषयी वेगवेगळ्या गॉसिप हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अनेकदा कुठलाही आधार किंवा पुरावा नसताना केलेल्या या चर्चा सेलिब्रेटींनी किती तापदायक ठरु शकतात याविषयी प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांनी परखडपणे मत व्यक्त केले आहे.

७० ते ८० च्या दशकांत आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांना जिंकून घेणाऱ्या जीनत अमान यांच्या नावाची त्यावेळी मोठी क्रेझ होती. त्यावेळच्या मोठ्या सेलिब्रेटींमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे. जीनत अमान लोकप्रिय अभिनेत्री झाल्यानंतर त्यांच्याविषयीच्या वेगवेगळया चर्चा वृत्तपत्र, मासिकांमधून छाप येत असे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं यासगळ्या गोष्टीचा आपला किती मनस्ताप झाला याविषयी सांगितलं आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आता जीनत अमान या इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहेत. याशिवाय वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधील त्या नेहमीच दिसून येतात. वयाची सत्तरी पार केल्यानंतर जीनत अमान यांचा लूक आणि फिटनेस प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय असतो. १९७० च्या एका मासिकानं त्यांच्याविषयी दिलेल्या बातमीनं त्यांना खूपच मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेव्हा त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

त्यावेळच्या त्या चर्चेनं आपल्याला नैराश्याचा सामना करावा लागला होता. असे जीनत अमान यांनी म्हटले आहे. लोकं जेव्हा त्या बातम्या वाचतात तेव्हा त्यांना ते खरं वाटू लागते. आणि ते आमच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेप्शन करु लागतात. जे आम्हाला खूपच त्रासदायक ठरते. लोकांना काहीही माहिती नसते. ते त्यांना माहिती असण्याचे काहीही कारण नाही. पण उगाचच गॉसिपिंगच्या नादात आम्हाला त्याचा त्रास होतो.

लोकांच्या बोलण्याचा आमच्यावर काय परिणाम होतो याचा विचार कुणीही करत नाही. आता मी इंस्टाग्रामसारख्या माध्यमावर आहे. मात्र त्याकाळी हे सगळं नव्हतं. अनेक पेपर किंवा मॅगझीनमधून सेलिब्रेटींविषयी जे काही छापून यायचे लोकं त्यावर विश्वास ठेवत असे. आमच्याबद्दल चर्चा करायचे. त्याचा आम्हालाच खूप मानसिक त्रास व्हायचा. अशा शब्दांत अमान यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT