Zeenat Aman bollywood Actress insta post esakal
मनोरंजन

Zeenat Aman Post : 'माझा रोमिओ कुठे दिसत नाही पण...' सत्तरी ओलांडलेल्या झिनत अमान यांनी खास कारणासाठी केलं सेलिब्रेशन!

झिनत अमान या नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखल्या गेल्या. ८० च्या दशकांत आपल्या बोल्डनेसनं झिनतजींनी चाहत्यांना जिंकून घेतले होते.

युगंधर ताजणे

Zeenat Aman bollywood Actress insta post : प्रसिद्ध अभिनेत्री झिनत अमान या नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांसाठी ओळखल्या गेल्या. ८० च्या दशकांत आपल्या बोल्डनेसनं झिनतजींनी चाहत्यांना जिंकून घेतले होते. सत्यम शिवम सुंदरममधील त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. वयाची ७२ वर्षे पूर्ण केल्यानंतर झिनतजी सोशल मीडियावर सतत संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या इंस्टावर झिनत अमान यांनी जी पोस्ट व्हायरल केली आहे ती त्यांच्याविषयी खूप काही सांगून जाणारी आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला अजूनही चाहत्यांकडून जे प्रेम मिळत आहे त्याविषयी आदराची भावना व्यक्त केली आहे. चाहते खूप प्रेम करतात त्यांनी नेहमीच संवादाची भूमिका ठेवली हे खूप छान आहे. असे जीनतजी म्हणतात.

काही दिवसांपूर्वी झिनत अमान यांनी एका पोस्टमधून तरुणाईला काही महत्वाचे सल्ले दिले होते. सध्याच्या धकाधकीच्या आणि चंगळवादाच्या दुनियेत तरुणांनी दोन पैशांची बचत करुन निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगता येईल याकडे अभिनेत्रीनं लक्ष वेधले होते. त्यांच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटसचा वर्षाव केला होता. आताची पोस्ट ही त्यांनी आपण पाच लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला याबद्दलची आहे.

ती खास पोस्ट शेयर करताना झिनतजी म्हणतात, भलेही मला माझा रोमिओ कुठे दिसत नाही पण माझ्या प्रोफाईलवरील चाहत्यांची, फॉलोअर्सची संख्याही पाहिली की मला माझे उत्तर मिळून जाते. मी एवढ्या फॉलोअर्सशी एकाच वेळी बोलू शकते, संवाद साधू शकते ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.

खरं सांगू हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन आहे. पण तितकेच ते मला समाधान अन् आनंदही देणारे आहे. आतापर्यतचा सारा प्रवास त्यातून आलेले अनुभव, तो संघर्ष याविषयीच्या कित्येक गोष्टी विषयी बोलावसं वाटतं. अशावेळी हे सगळं या माध्यमातून तुम्हाला सांगता येतं. याविषयी आनंद वाटतो. अशा आशयाची पोस्ट झिनतींनी शेयर केली आहे.

झिनतजींच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही त्यांना उस्फुर्त दाद दिली आहे. त्यांचे कौतुक होत आहे. एकानं म्हटलं आहे की, तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT