Zeenat Aman Insstagram
मनोरंजन

Zeenat Aman: इन्स्टाग्रामवर का आल्यात झीनत अमान? नव्या पोस्टमधनं कारण सांगत सगळ्यांना केलं थक्क..

वयाच्या सत्तरीत इन्स्टाग्रामवर आपलं अकाउंट ओपन केलेल्या झीनत अमान यांनी काही दिवसांतच १ मलियन फॉलोअर्सची तगडी कमाई केली आहे.

प्रणाली मोरे

Zeenat Aman: बॉलीवूडची दिग्ग्ज अभिनेत्री झीनत अमान यांनी ११ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं होतं. ज्यानंतर अभिनेत्री आपल्या काही जुन्या आठवणी,किस्से,फोटो शेअर करताना दिसतात.

काहीच आठवड्यात इन्स्टावर त्यांचे 82.8K अधिक फॉलोअर्स आहेत. यावरनं स्पष्ट होतं की अभिनेत्रीच्या चाहत्यांची लिस्ट आजही भलीमोठी आहे. लेटेस्ट पोस्टमधून झीनत अमान यांनी आपण इन्स्टावर का आलो याविषयी स्पष्टिकरण देत कारण सांगितले अन् सगळ्यांना थक्क करून सोडलं.

झीनत अमान सध्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे भलत्याच चर्चेत आहेत. लेटेस्ट फोटो त्यांनी शेअर केला आहे,ज्यात त्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. आणि त्या फोटोसोबत त्यांनी लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

त्यांनी आपल्या चाहत्यांनी केलेल्या मेसेजेससाठी,कमेंट्ससाठी त्यांचे आभारही मानले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की,'' एवढ्या सगळ्या मेसेजेसना उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे माझ्याकडून धन्यवादाचा स्विकार करा''.(Zeenat Aman shares why she is on instagram.)

अभिनेत्री झीनत अमान पुढे म्हणाल्या की, ''मी माझी मुलं अजान आणि जहानसोबत इन्स्टाग्रामवर मी आलेय त्याचं उद्दिष्ट्य काय आहे याची चर्चा करत होती. मला वाटतं की मी इन्स्टाग्रामवर समाजासाठी जे मुद्दे बोलणं गरजेचे आहेत त्यांना अधिक महत्त्व देईन''.

''२००६ मध्ये माझा पहिला कुत्रा राफेलला दत्तक घेतले पण त्याअगोदर पासूनच माझ्या मनात मुक्या जनावरांप्रती प्रेम होतं. रॅफीच्या येण्यानं,त्याच्या प्रेमानं मी पुरती बदलले..त्यानं मला सगळ्या प्राण्यांकडे प्रेमळ नजरने पहायला शिकवलं''.

''पशु कल्याण.. खरचं एक अशी गोष्ट आहे ज्याच्याप्रती मी इन्स्टाग्रामवर अधिक भाष्य करेन''.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

झीनत अमान यांच्या या पोस्टवर युजर्स कमेंट करताना दिसत आहेत. शिल्पा शेट्टीनं देखील लिहिलं आहे-'आम्ही नेहमी सगळ्या प्राण्यांशी चांगलं वागतो आणि कायम वागत राहू झीनतजी'. सिने-निर्माता तनुजा चंद्रानं लिहिलंय,'इन्स्टाग्रामला चांगल्या उद्दिष्टपूर्ण कामांवर बोलण्यासाठी वापरलं पाहिजे. ज्याचा जगाला जास्त फायदा होईल. पशु कल्याण कामाप्रती तुम्ही जे पाऊल उचलले आहात ते प्रंशसनीय आहे'.

कितीतरी युजर्स झीनत अमान यांच्या पोस्टवर चांगल्या कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT