Zeeshan Khan On Calling Terrorist Esakal
मनोरंजन

Zeeshan Khan: 'अरे तुझ्या सारख्यांना', 'आतंकवादी' म्हणताच अभिनेत्याची सटकली...

Vaishali Patil

बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड कलाकार म्हटलं तर जितकी चाहते असतात तितकेच ट्रोल करणारेही असतात. त्याचबरोबर याला टिव्हि कलाकारही अपवाद नाहीत. यातच सेलिब्रिटींना त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडियावर सक्रिय रहावे लागते.

चाहतेही त्याच्या आवडत्या कलाकाराची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. त्यांनी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताच त्याच्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो. मात्र त्यातच काहीजण त्यांना ट्रोलही करतात.

असचं अलीकडेच बिग बॉस आणि लॉक अप फेम झीशान खान याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका व्यक्तीने चक्क त्याला 'दहशतवादी' म्हणतं ट्रोल केलं. मात्र हे वाचून शिझानही गप्प बसला नाही तर त्याने त्या युजरला सडेतोड उत्तर दिलयं. सध्या त्याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Zeeshan Khan On Calling Terrorist

त्याच झालं असं की, झीशानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो ब्लॅक लूकमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसला. अनेकांनी त्याच्या फोटोचे कौतुक केले, तर एका यूजरने त्याला 'दहशतवादी' म्हटले.

यावर त्याने उत्तर देत म्हटलं की, 'होय कारण मी तुझ्यासारख्या लोकांच्या समोर आलो ना तर तू खुपच घाबरलशील!' झीशानचे चाहतेही त्याच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देत आहेत.

झीशान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याला खरी ओळख 'कुमकुम भाग्य' या शोमधून मिळाली. त्यानंतर तो 'बिग बॉस ओटीटी'मध्येही दिसला. इथेही तो चांगलाच लाइमलाइटमध्ये आला त्यानंतर तो 'लॉक अप' शोमध्ये दिसला होता. या शोने त्याला खूप प्रसिद्धी दिली.

झीशान खान त्याच्या लव्ह लाईफमुळेही चांगलाच चर्चेत आला. तो 'कुमकुम भाग्य' मधील आलिया उर्फ ​​रेहना पंडितला डेट करत आहे. रेहाना त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. गेल्या वर्षीच त्यांनी त्याचे नाते सार्वजनिक केले.

वयातील फरकामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मात्र, याचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला नाही. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT